ऐश्वर्याचा ‘फन्ने खान’मधील जबरदस्त लूक रिलीज

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या आगामी ‘फन्ने खान’ या सिनेमातील लूक समोर आला आहे. या सिनेमाच्या निर्मिती संस्थेने हा लूक ट्विटरवर शेअर केलाय. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 13, 2018, 09:13 PM IST
ऐश्वर्याचा ‘फन्ने खान’मधील जबरदस्त लूक रिलीज

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या आगामी ‘फन्ने खान’ या सिनेमातील लूक समोर आला आहे. या सिनेमाच्या निर्मिती संस्थेने हा लूक ट्विटरवर शेअर केलाय. 

ऐश्वर्याच्या ‘फन्ने खान’ची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगली आहे. यातील तिच्या भूमिकेचीही उत्सुकता वाढली आहे. या सिनेमात ऐश्वर्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. 

ऑस्करला नामांकन मिळालेल्या Everybody’s Famous या सिनेमाचं ‘फन्ने खान’ हे अडॉप्शन आहे. यामुळे या सिनेमात नेमकं काय असणार याचीही उत्सुकता आहे. अनिल कपूर ‘ताल’ नंतर ऐश्वर्यासोबत काम करत आहे. तर राजकुमार राव हा पहिल्यांदाच ऐश्वर्यासोबत काम करत आहे.