बॉलिवूडमध्ये दिसणार 'ही' साऊथची अभिनेत्री

साऊथच्या अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहेत. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Mar 8, 2018, 03:32 PM IST
बॉलिवूडमध्ये दिसणार 'ही' साऊथची अभिनेत्री

मुंबई : साऊथच्या अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहेत. 

  साऊथच्या अभिनेत्रींना बॉलिवूड कायमचे खुणावताना दिसतं. आणि साऊथच्या या अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये संधी मिळावी हे म्हणूनच साऊथच्या प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते. 

ही अभिनेत्री करणार एन्ट्री 

साऊथची अभिनेत्री गायत्री अय्यर हिचेही हेच स्वप्न होते आणि विशेष म्हणजे, तिचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. होय, ‘रेड’ या चित्रपटाद्वारे गायत्री बॉलिवूड डेब्यू करतेय. या चित्रपटात गायत्री अजय देवगण सारख्या आघाडीच्या अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. तसेच गायत्री या सिनेमात ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून नाही तर ती आयकर गुप्तचराच्या भूमिकेत दिसणार आहे आणि गायत्री यामुळेच जाम खूश आहे. बॉलिवूडमधील माझी सुरुवात एका वास्तववादी भूमिकेने होतेय, याचा मला आनंद आहे, असं गायत्रीने सांगितलं.

दक्षिणात्य चित्रपटांत काम करतानाही अशाच भूमिकांकडे माझा कल राहिला. झाडांच्या आजुबाजूला नाचायला मी घाबरते, म्हणून नव्हे तर वास्तववादी भूमिका  एक वेगळे समाधान देऊन जातात. याऊलट ग्लॅमरस भूमिका सरतेशेवटी नीरस वाटून जातात, असे देखील गायत्री म्हणाली.