मुंबईचा 'भूत बंगला' ठरला या 2 कलाकारांसाठी लकी, हे कलाकार झाले सुपरस्टार

या मायानगरीतल्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल थोड्या लोकांनाच माहितं आहे

Updated: May 14, 2021, 04:44 PM IST
मुंबईचा 'भूत बंगला' ठरला या 2 कलाकारांसाठी लकी, हे कलाकार झाले सुपरस्टार title=

मुंबई : नशीब आजमावण्यासाठी दररोज बरीच लोकं मुंबईत येत असतात. या मायानगरीतल्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल थोड्या लोकांनाच माहितं आहे. प्रत्येक कलाकाराला त्याच्या कारकीर्दीतून नाव मिळावं आणि त्याने नेहमी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करावं असं वाटत असतं. यासाठी मग ते काय काय करत नाहीत. अशावेळी स्टार्स अंधश्रद्धेला देखील बळी पडतात. असाच एक रंजक किस्सा मुंबईतल्या 'भूत बंगल्याचा' आहे. ज्यामुळे 2 स्टार सुपरस्टार बनले.

राजेश खन्ना आणि राजेंद्र कुमारसाठी लकी
आपण बोलत आहोत मुंबईच्या कार्टर रोडवर असलेल्या एका सुंदर बंगल्याबद्दल. ज्यामध्ये राजेश खन्ना आणि राजेंद्र कुमार यांचं नशीब बदललं. या दोन्ही स्टार्सनाही हा बंगला खूप आवडला होता. असं म्हणतात की, एकेकाळी ज्याला 'भूत बंगला' असं म्हटलं जायचं ते घर या दोघांसाठी लकी ठरलं.

60 हजार रुपयांत घर विकत घेतलं
बरीच वर्ष लोक कार्टर रोडवरील या बंगल्याला 'भूत बंगला' म्हणायचे. या बंगल्याचा मालक देखील कमी दराने हा बंगला विकायला तयार होता. त्याचवेळी राजेंद्र कुमार आपल्या कुटुंबासाठी चांगल्या घराच्या शोधात होते. मग त्यांना या घराबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी हे घर केवळ 60 हजार रुपयांमध्ये विकत घेतलं.

राजेंद्र कुमार यांचं चमकलं नशीब
राजेंद्र कुमार यांनी या घराला आपल्या मुलीचं नावं दिलं. या बंगल्यांच नाव त्यांनी 'डिंपल' ठेवलं. या बंगल्यामध्ये येताच राजेंद्रकुमार यांचे दिवस पलटले.

काही वर्ष स्ट्रगल करणार्‍या अभिनेत्यानेचे चित्रपट अचानक हिट होवू लागले. 60-70चं दशक असं होतं की, सगळीकडेच राजेंद्र कुमार यांचा बोलबाला होता. त्यांचे चित्रपट २५ आठवडे थिएटरमध्ये टिकायचे.

राजेंद्र कुमार 'ज्युबिली कुमार' बनले.
या सक्सेसमागे राजेंद्र कुमार यांची मेहनतही होती तर दुसरीकडे हा बंगलादेखील त्यांच्यासाठी लकी ठरत होता, असं ते म्हणायचे. यानंतर त्यांनी एक-एक करून हिट चित्रपट दिले.

ते फिल्मइंडस्ट्रीमध्ये 'ज्युबिली कुमार' म्हणून ओळखले जावू लागले. ते बॉलिवूडचे सर्वात श्रीमंत सुपरस्टार बनले. त्यांच्या स्टारडमबरोबरच या बंगल्याचीही इंडस्ट्रीमध्येही बरीच चर्चा झाली.

राजेंद्र कुमार यांनी राजेश खन्ना यांना घातली अट
काही काळानंतर सिनेसृष्टीत राजेश खन्ना यांनी एन्ट्री घेतली. राजेश यांनी हा बंगला खरेदी करण्याची इच्छा राजेंद्र कुमार यांच्यासमोर व्यक्त केली.

कसा-बसा हा बंगला विकायला राजेंद्रकुमार तयार झाले. मात्र, राजेंद्र यांनी राजेश खन्नासमोर एक अट ठेवली. त्यांना या बंगल्याचं नाव बदलावं लागेल अशी अट राजेश खन्ना यांच्या समोर त्यांनी ठेवली. त्यासाठी राजेशही लगेच तयार झाले.

राजेश खन्ना सुपरस्टार बनले
या बंगल्याला आधी भूत बंगला अशी ओळख मिळाली होती. मात्र या बंगल्यामुळे खरोखरच दोन स्टार्सच भाग्य बदललं. राजेंद्र कुमार नंतर जेव्हा राजेश खन्ना या घरात शिफ्ट झाले तेव्हा ते देखील उंचीच्या शिकरावर पोहचले. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट साईन केले.

राजेश खन्ना यांच्यानंतर शशी किरण शेट्टी यांनी विकत घेतला बंगला
तर दुसरीकडे हा बंगला सोडल्यानंतर राजेंद्रकुमार यांची प्रकृती बिघडू लागली. बंगला विकल्यानंतर त्यांचे कुटुंबिय देखील त्यांच्यावर रागावू लागले होते.

राजेश खन्ना यांनी राजेंद्र यांना या बंगल्याची रक्कम हप्त्यांमध्ये दिली. २०१२ मध्ये राजेश खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हा बंगला 'ऑल कार्गो लॉजिस्टिक'चे अध्यक्ष शशी किरण शेट्टी यांना ९० कोटींना विकला.