अॅक्टिंगमध्ये फ्लॉप झालेला 'हा' अभिनेता आता करणार दिग्दर्शन

पाहा कोण आहे हा अभिनेता 

अॅक्टिंगमध्ये फ्लॉप झालेला 'हा' अभिनेता आता करणार दिग्दर्शन  title=

मुंबई : बॉलिवूडमधील एक अभिनेता आपल्या पहिल्याच सिनेमाने सुपरहिट ठरला. अगदी पहिला सिनेमा सुपरहिट दिल्यामुळे या अभिनेत्याची जोरदार चर्चा रंगली. मात्र त्यानंतर त्याचा कोणताही सिनेमा चालला नाही. अनेक सिनेमांत अभिनेता म्हणून आपलं नशिब आजमावल्यानंतर आता हा अभिनेता दिग्दर्शनाकडे वळला आहे. अभिनेता म्हणून हिट न ठरलेल्या या अभिनेत्याने आपला मोर्चा सिनेमाकडे वळवला आहे. कोण आहे हा अभिनेता. 

हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा भाचा इमरान खान. २००८ मध्ये इमरान खानने 'जाने तू या जाने ना...' या सिनेमातून रोमँटिक हिरो म्हणून पदार्पण केलं. या सिनेमातून इमरान खानने आपली वेगळी छबी निर्माण केली. मात्र त्यानंतर इमरान खानचा एकही सिनेमा चालला नाही. पण आता इमरान खानने करण जोहर प्रोडक्शन कंपनी 'धर्मा 2.0' च्या अंतर्गत तयार होत असलेल्या एका जाहिरातीच दिग्दर्शन केलं आहे. मात्र आता तो कोणत्या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे हे मात्र अद्याप कळलेलं नाही. 

या सिनेमातून इमरान खान दिग्दर्शनात करणार पदार्पण 

इमरान खान आपल्या दिग्दर्शनाची सुरूवात करत आहे. 'स्लिंगशॉट' या सिनेमातून इमरान खान दिग्दर्शक म्हणून जगासमोर येणार आहे. हा सिनेमा देखील करण जोहरच्या कंपनी अंतर्गत म्हणजे धर्मा प्रोडक्शन अंतर्गत असल्याचं सांगितलं जात आहे. या सिनेमात लीड रोलमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहे. मात्र अद्याप अभिनेत्रीचा खुलासा झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, स्लिंगशॉट हा सिनेमा राजकारणावर आधारित आहे. इमरान खान बऱ्याच दिवसांपासून दिग्दर्शनाच्या शोधात होता. २०१७ फेब्रुवारीमध्ये या संदर्भात एका निर्मात्याची भेट देखील घेतली होती. मात्र त्या प्रोड्युसरने स्क्रिप्टमध्ये काही बदल करण्यास सांगीतले. अखेर सगळ्या अडथळे पार करत इमरान खान दिग्दर्शनाचं काम सुरू करणार आहे. 

सिद्धार्थ मल्होत्रा सध्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्राच्या बायोपिकमध्ये व्यस्त आहे. या सिनेमांत सिद्धार्थ कियारा आडवाणीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. यानंतर तो 'शॉटगन शादी' या सिनेमाचं शुटिंग करणार आहे. या सिनेमात सिद्धार्थ परिणीती चोप्रासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या दोन्ही सिनेमाची निर्मिती करण जोहर करणार आहे.