इरफान खान लवकरच बॉलिवूडमध्ये करणार पुनरागमन

या सिनेमात दिसणार इरफान 

इरफान खान लवकरच बॉलिवूडमध्ये करणार पुनरागमन title=

मुंबई : अभिनेता इरफान खान गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये न्यूरो इंडोक्राइन ट्यूमरवर उपचार घेत आहेत. हळू हळू अभिनेता इरफान याच्या तब्बेतीत फरक पडत आहे. काही दिवसांपूर्वी इरफान खानने ट्विटरवर आपला फोटो पोस्ट केला होता. आता त्याचा हा फोटो बघून चाहते खूप खूष झाले होते. या फोटोसोबत आणखी एक चांगली बातमी इरफान खानच्या आयुष्याशी संबंधातली समोर आली आहे. हल्ली इरफान स्वतः आणि त्याचे चाहते स्क्रीनवर वापसी करण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. आणि त्याच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे इरफान खान नवीन प्रोजेक्ट साइन केला आहे. 

कोणत्या सिनेमात करणार काम ?

डेक्कन क्रोनिकलच्या रिपोर्टनुसार इरफान खानने सुजीत सरकारसोबत एक सिनेमा साइन केला आहे. हा सिनेमा कधी सुरू होणार याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. मात्र लवकरच इरफान खान बॉलिवूडमध्ये वापसी करणार आहे. हा सिनेमा देशभक्तीवर आधारित असून मीडिया रिपोर्टनुसार इरफान खानसोबत पीकू बनवलेल्या सुजीत सरकार शहीद ऊधम सिंह यांच्यावर आधारिता बायोपिक तयार करत आहे. आणि इरफान खान या सिनेमात त्यांचाच रोल साकारत असल्याची चर्चा आहे. 

काही दिवसांपूर्वी सुजीत सरकारने इरफान खानची लंडनमध्ये जाऊन भेट घेतली. या भेटी दरम्यान दोघांमध्ये बायोपिकबाबत चर्चा झाली. इरफान खानची तब्बेत गेल्या काही दिवसांपासून चांगली सुधारत आहे. अशी आशा केली जात आहे की, लवकरच इरफान बॉलिवूडमध्ये एन्ट्री करेल. 

कोण आहेत शहीद ऊधम सिंह

शहीद ऊधम सिंह हे स्वतंत्रता संग्राममधील महान क्रांतिकारक होते. ज्यांनी देशाला स्वतंत्र मिळवून देण्यात मोठं योगदान दिलं. शहीद ऊधण सिंह यांनी जलियावाला बागमध्ये नरसंहारचे दोषी जनरल डायरला लंडनमध्ये जाऊन गोळ्या झाडल्या. आणि निर्दोष लोकांच्या खूनाचा बदला घेतला होता.