44 वा वाढदिवसावेळी धर्मेंद्र यांचा रोमँटिक अंदाज... आई- वडिलांच्या नात्यातील खास दिवशी मुलं गैरहजर

ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला काल 2 मे रोजी 44 वर्ष पूर्ण झाली. 44 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ड्रीम गर्ल यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला शेअर करत धर्मेंद्र यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हेमा मालिनी यांनी जो व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांच्या दोघांच्या तारुण्यातील फोटो आणि आठवणी पाहायला मिळाल्या. त्याशिवाय त्यांनी हा खास दिवस एकत्र साजरा केला आहे. त्याचे अनेक फोटो समोर आले आहेत.   

| May 03, 2024, 11:36 AM IST
1/7

ईशा देओलनं दिली साथ

आई-वडिलांच्या लग्नाच्या 44 व्या वाढदिवसानिमित्तानं ईशा देओलनं हजेरी लावली होती. त्या दोघांसोबत तिनं वेळ व्यथित केला. 

2/7

हेमा मालिनी यांनी शेअर केले फोटो

हेमा मालिनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या लग्नाच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत. त्यातीत एकात धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांना गालावर किस करताना दिसत आहेत.   

3/7

फोटो व्हायरल

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं हेमा आणि धर्मेंद्र यांनी एकमेकांना फुलांचा हार घातला आहे. 

4/7

दोघांचे पेहराव

धर्मेंद्र यांनी नारंगी रंगाचं शर्ट परिधान केलं होतं तर हेमा मालिनी यांनी क्रीम आणि लाल रंगांची साडी नेसली आहे. ते दोघं खूप आनंदात दिसत आहेत.   

5/7

चाहत्यांच्या शुभेच्छा

हेमा मालिनी यांनी शेअर केलेल्या या फोटोंना पाहून नेटकऱ्यांनी त्यांना खूप शुभेच्छा दिल्या आहेत. 

6/7

मुलांची अनुपस्थिती

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सनी किंवा बॉबी या दोघांपैकी कोणीही हजेरी लावली नाही. त्यासोबत लेक अहाना आणि तिचा नवरा देखील दिसला नाही.   

7/7

कधी केलं लग्न?

1980 मध्ये धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्या दोघांना दोन मुली असून ईशा आणि अहाना अशी त्यांची नावं आहेत.