या व्यक्तीच्या प्रेमात होत्या लता मंगेशकर, पण...

कोण आहेत हे महाराज 

या व्यक्तीच्या प्रेमात होत्या लता मंगेशकर, पण...  title=

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. भारतरत्न लता मंगेशकर यांनी 90 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. लता मंगेशकर 28 सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करतात. लता मंगेशकर 28 सप्टेंबर 1929 मध्यप्रदेश इंदौरमध्ये झाला. लता दिदींच्या संगीत करिअरमधील सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. पण त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल आपण खूप कमी गोष्टी जाणतो. लता दिदींचे चाहते संपूर्ण जगात आहे आणि प्रत्येकाच्या मनात आजही एक प्रश्न भेडसावत आहे तो म्हणजे लतात दिदींनी लग्न का केलं नाही? 

तु्म्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की त्यांना प्रेम झालं होतं ती व्यक्ती कुणी सामान्य नव्हती. तर ते एक महाराज होते. लता मंगेशकर यांना आपल्या भावाचा हृदयनाथ मंगेशकरांचा मित्र आवडत होता. लता मंगेशकर यांनी कुणी एका सामान्य व्यक्तीला नाही तर एका महाराजाला निवडलं होतं. जर त्या महाराजासोबत लता दिदींच लग्न झालं असतं तर आज लता मंगेशकर एका राज्याच्या राणी असत्या. मात्र लता दिदींच्या आयुष्यात काही तरी वेगळं घडणार होतं. जेव्हा पण लता दिदींना त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं जातं तेव्हा त्यांनी कायम एकच उत्तर दिलं की, घरच्या जबाबदारीमुळे त्या लग्न करू शकल्या नाहीत. 

लता दिदींना डुंगरपूर राजघराण्यातील महाराज राज सिंह यांच्याशी प्रेम झालं. लता दिदी आणि महाराज राज यांची ओळख तेव्हा झाली जेव्हा ते लॉ चा अभ्यास करण्याकरता मुंबईत आले. तेव्हा लता दिदी देखील त्यांना भेटायला हृदयनाथ मंगेशकरांसोबत त्यांच्या घरी जात असतं. मात्र लता दिदी आणि राज यांनी लग्न केलं नाही. कारण राज यांच्या कुटुंबियांनी अगोदरच सांगितलं होतं की, ते कोणत्याही सामान्य मुलीशी लग्न करू शकत नाही. आणि महाराज राज यांनी देखील आपल्या कुटुंबियांना दिलेला शब्द पाळला. पण हे दोघं एकमेकांच्या प्रेमात एवढे आकंठ बुडाले होते की त्यांनी आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.