मुलीच्या अफेअरला महेश भट्ट यांचा हिरवा कंदील

महेश भट्ट यांनी केला मोठा खुलासा 

मुलीच्या अफेअरला महेश भट्ट यांचा हिरवा कंदील  title=

मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या रोमान्सच्या भरपूर चर्चा कानावर येत आहेत. अनेकदा एकत्र दिसणारे हे दोघे 'ब्रम्हास्त्र' या सिनेमात लवकरच झळकणार आहेत. असं असताना आता या दोघांच्या नात्यावर चक्क दिग्दर्शक महेश भट्ट यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

आलिया आणि रणबीरचे चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून याची वाट पाहत होते. आलियाच्या कुटुंबियांच या नात्यावर काय म्हणणं आहे? हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचं होतं. 

अखेर महेश भट्ट यांनी या नात्याबद्दल कन्फर्म वक्तव्य केलं आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, आलिया प्रेमात पडली आहे. आलिया बॉलिवूडच्या हिरोला डेट करत असल्याचं देखील त्यांनी सांगितल. 

एवढंच काय तर महेश भट्ट यांनी आलियाच्या पसंतीला हिरवा कंदील दिला आहे. त्यांना देखील रणबीर पसंत असल्याचं 'चांगला मुलगा' या शब्दात त्यांच कौतुक केलं आहे. 

महेश भट्ट यांनी पुढे सांगितलं की, या दोघांना आपल्या नात्याबद्दल स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांच्या रिलेशनशिपबद्दल जो काही निर्णय घ्यायचा तो त्या दोघांनीच घ्यायचा आहे. 

आलिया भट्ट आणि रणबीर यांच्या लग्नाबद्दल महेश भट्ट म्हणाले की, त्या दोघांना कोर्ट मॅरेज करायचं आहे. आणि हे असं त्यांनी का ठरवलं याबाबत ते दोघेच सांगू शकतील. एवढंच काय तर त्यांच नातं पुढे कसं असेल त्यावर ते कसं लग्न करतील हे ठरवलं जाईल.