कास्टिंग काऊचवर काय बोलली मंदिरा बेदी?

कास्टिंग काऊच या विषयावर कायम बॉलिवूडमध्ये चर्चा रंगलेली असते. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Feb 1, 2018, 08:34 PM IST
कास्टिंग काऊचवर काय बोलली मंदिरा बेदी?  title=

मुंबई : कास्टिंग काऊच या विषयावर कायम बॉलिवूडमध्ये चर्चा रंगलेली असते. 

अनेक सेलिब्रेटीज वेगवेगळ्या मुद्यांवर आपला आवाज उठवत असतात. याच मुद्यावर अभिनेत्री मंदिरा बेदीने देखील आपलं परखड मत व्यक्त केली आहे. कास्टिंग काऊचमध्ये फक्त एकाच व्यक्तीचा गुन्हा नाही असं म्हणाली मंदिरा बेदी. मंदिरा बेदीचा वोदका डायरीज हा सिनेमा 19 जानेवारीला प्रदर्शित झाला. तिथेच कास्टिंग काऊचबाबत ती एका मुलाखतीत बोलली. 

मंदिराने हे स्पष्ट केले की, कास्टिंग काउच प्रकरणात केवळ एकट्याचीच चूक नसते. दोघांची सहमती असल्याशिवाय असे घडूच शकत नाही. पुढे मंदिरा म्हणाली की, मी या इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही काळापासून आहे. माझ्याशी आतापर्यंत कोणीही अशाप्रकारची चर्चा केली नाही. ‘मी गेल्या २३ वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करीत आहे. माझ्यावर कधीच असा प्रसंग उद्भवला नाही. कोणीही मला अशाप्रकारची आॅफर दिली नाही. मी कधीच त्या स्थानी राहिली नाही की, लोकांनी मला काम देण्याच्या मोबदल्यात माझे शोषण करावे.

पुढे बोलताना मंदिराने म्हटले की, ‘तुम्ही एकट्या व्यक्तीवर याबाबतचा ठपका ठेवू शकत नाही. कारण कोणीही तुमच्याकडे यावं अन् कॉम्प्रोमाइजविषयी बोलावं एवढी सोपी गोष्ट नाही. त्यामुळे मला असे वाटते की, जर एखाद्याने तुम्हाला कॉम्प्रोमाइज करण्याची आॅफर दिली तर तुम्ही राजी झाल्याशिवाय हा प्रकारच घडू शकत नाही.’

मंदिरा बेदीची शांती ही लोकप्रिय मालिका. या मालिकेच्या माध्यमातून मंदिरा प्रत्येक घराघरात पोहोचली. तसेच आताही मंदिरा आपल्या बोल्ड आणि हॉट अंदांनी प्रेक्षकांना घायाळ करते.