'मणिकर्णिका' चा टिझर लाँच होताच कंगना झाली ट्रोल

काय म्हणाले प्रेक्षक 

'मणिकर्णिका' चा टिझर लाँच होताच कंगना झाली ट्रोल  title=

मुंबई : कंगना रानावतचा सिनेमा 'मणिकर्णिका' अगदी सुरूवातीपासूनच चर्चेत आहे. आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. या सिनेमात झाशीच्या राणीच्या रुपात आपल्या कंगना अतिशय साहसी आणि धाडसी दिसली. या संपूर्ण ट्रेलरमधून कंगना आपल्यावर एक वेगळीच छाप मारते. झाशीच्या राणीच्या रुपात असलेली कंगना इतर कॅरेक्टरपेक्षा यामध्ये लक्षवेधी ठरली आहे. 

मात्र असं असताना, युझर्सने मात्र वेगळीच रिअॅक्शन दिली आहे. काहींनी आता पुन्हा एकदा तिला नॅशनल अॅवॉर्ड मिळणार हे नक्की अशी आशा वर्तवली आहे. तर काहींनी कंगनाला ट्रोल केलं आहे. 

काहींनी म्हटलं की, कंगना राणी लक्ष्मीबाई यांच्या कॅरेक्टरमधून एक वेगळीच उंची गाठणार आहे. जर हा सिनेमा उत्तर प्रदेशात टॅक्स फ्री केला जातो तर नक्कीच हा सिनेमा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरेल. 'मणिकर्णिका' ट्रेलरला सोशल मीडियावर अतिशय पसंती मिळत आहे. पण यावरील प्रतिक्रिया मात्र भिन्न आहेत काहींनी कंगना रानावतच्या हावभावाची मस्करी केली आहे.

दत्तक मुलाला पाठीवर घेऊन राणी लक्ष्मीबाई इंग्रजांविरूद्ध कसा लढा देतात हे आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहे. पण कंगनाच्या डायलॉगबाबत चाहत्यांनी खूप मस्करी उडवली आहे. कंगना 'आझादी' बोलते की 'चाचाजी' हेच कळत नसल्याच प्रेक्षक सांगतात.