Amitabh Bachchan, Anushka Sharma यांना दुचाकी सफर पडली महागात, भरावा लागणार हजारोंचा दंड

Mumbai Police : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या दोघांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबई पोलिसांनी यांच्यावर दंड ठोठावला. अमिताभ आणि अनुष्काचा बाइक राइडचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: May 18, 2023, 09:46 AM IST
Amitabh Bachchan, Anushka Sharma यांना दुचाकी सफर पडली महागात, भरावा लागणार हजारोंचा दंड  title=
Amitabh Bachchan and Anushka Sharma Challan

Amitabh Bachchan and Anushka Sharma Challan: बॉलिवूड सिनेसृष्टीतील मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांचा बाईक प्रवास चांगलाच चर्चेत आहे. बिग बींनी मुंबईचे ट्रॅफिक (Mumbai Traffic) टाळण्यासाठी आणि सेटवर वेळेत पोहोचण्यासाठी एका फॅनसोबत बाईकवरून प्रवास केला. त्याचा फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण हळूहळू सोशल मीडियावरी लोकांचे लक्ष त्यांच्या हेल्मेट न घालण्याकडे गेले आणि बिग बी यांच्यावर टीका होऊ लागली. 

सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि तक्रारींचा पाढा वाचल्याने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) या प्रकरणी उत्तर द्यावे लागले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बिग बी यांच्यावर कारावाई होऊ शकते, अशा बातम्या आल्या होत्या. दुसरीकडे अनुष्काही एका व्यक्तीच्या मागे बसून हेल्मेटशिवाय दुचाकीवरून प्रवास करताना दिसली. नेटकऱ्यांनी हेल्मेटचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या दोघांना नोटीस बजावली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का शर्माच्या बॉडीगार्डकडे वैध परवाना नव्हता कारण त्याचा लर्निंग लायसन्स 2020 मध्ये संपले होते. त्यामुळे त्याला 5 हजार रुपयांचा दंड आणि दुचाकीच्या मालकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय हेल्मेटशिवाय गाडी चालवल्याबद्दल त्याला 500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. म्हणजे एकूण 10,500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

 तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट न घातल्याबद्दल 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला अमिताभ यांनी खुलासा केला होता की, कामावर उशीर झाल्याने ते एका अनोळखी व्यक्तीसोबत बाईकवरुन शूटिंगच्या स्पॉटवर पोहोचले.

सुपरस्टारने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर कॅप्शनसह एक फोटो शेअर केला आहे, "राइडसाठी धन्यवाद मित्रा.. मी तुला वैयक्तिकरित्या ओळखत नाही... पण तरी तू मसा माझ्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवले. जाम ट्राफिकमुळे होणार विलंब टळला. नंतरच्या दिवसात, अनुष्का हेल्मेटशिवाय पिलियन सीटवर बसल्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कलम 129/194(D), कलम 5/180 आणि कलम 3(1)181 MV कायदा अंतर्गत हे चलन जारी करण्यात आले आहे. दोन्ही मालकांनाही दंड भरला आहे.