तनुश्री दत्ताच्या अगोदर 'या' अभिनेत्रींचा खळबळजनक आरोप

कोण कोण आलं समोर 

तनुश्री दत्ताच्या अगोदर 'या' अभिनेत्रींचा खळबळजनक आरोप  title=

मुंबई : दोन दिवस अगोदर तनुश्री दत्ताने आपल्यावर घडलेला 10 वर्षांपूर्वीचा प्रकार जगासमोर आणला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. असं नाही की, ही घटना काही पहिल्यांदाच घडली नाही या अगोदर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत अशा घटना घडल्या आहेत. काही अभिनेत्री या प्रकरणावर अनेकदा बोलल्या आहेत तर काहींनी अशा अभिनेत्रींना पाठिंबा दिला आहे. बॉलिवूडमधील कास्टिंग काऊच ही वाळवी अनेक वर्षांपासून लागली आहे. तनुश्री दत्ताने या बॉलिवूडमधील अनेक लोकांच्या गोष्टी अशा समोर आणल्या आहेत. 

'आशिक बनाया आपने' की तनुश्री दत्ता का खुलासा, 'एक्'€à¤Ÿà¤° ने की थी मेरे साथ वो हरकत...'

काय आहे तनुश्रीचं प्रकरण 

तनुश्री दत्ताने एका खाजगी चॅनलमध्ये मुलाखत देताना एका सिनेमाच्या शुटिंग दरम्यान नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला. त्यावर तनुश्रीने म्हणाली की, हे प्रकरण 10 वर्ष जुनं आहे पण तेव्हा इंडस्ट्रीमधील कुणीच माझी साथ दिली नाही. तनुश्रीच्या या मुलाखतीतनंतर अनेकांनी तिचं समर्थन केलं आहे. 

राधिका आप्टे का फेसबुक अकाउंट हुआ हैक, कहा- कृपया मुझे मेसेंजर पर संदेश न दें

राधिका आपटेने मारली होती कानाखाली 

आपल्या दमदार अभिनयामुळे लोकप्रिय असलेली अभिनेत्री राधिका आपटेने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. राधिका जेव्हा आपल्या शुटिंगसाठी सेटवर गेली होती तेव्हा साऊथचा सुपरस्टारने त्याच्यासोबत गैरवर्तणूक केल्याचं समोर आलं. ज्यावर राधिकाने त्या व्यक्तीला कानाखाली मारली होती. या गोष्टीला तिथेच दाबण्यात आलं होतं. राधिकाने म्हटलं की, माझा त्या सेटवरचा पहिला दिवस होता. मी त्या व्यक्तीला कानाखाली मारली आणि त्यानंतर त्या व्यक्तीसोबत कधीच काम केलं नाही 

शूटिंग के दौरान सेट पर बिगड़ी सनी लियोनी की तबीयत, अस्पताल में भर्ती

पहिल्या म्युझिक व्हिडिओने दिला घाणेरडा अनुभव

तनुश्री दत्ताने आरोप लगावल्यावर सनी लिओनी देखील गप्प राहिली नाही. तिने एका मुलाखतीत सांगितलं की, महिलांसाठी ही इंडस्ट्री अशीच आहे. पहिल्याच म्युझिक व्हिडिओच्यावेळी तिला अतिशय घाणेरड्या अनुभवाला सामोरं जावं लागलं. जेव्हा एका लोकप्रिय रॅपरने तिच्यावर गैरवर्तणूक केलं. 

Kangana Ranaut

कंगनानेदेखील केला मोठा खुलासा 

कंगना रानोतचं प्रकरण तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. बॉलिवूडमध्ये जेव्हा कंगनाने एन्ट्री केली तेव्हा एक कटू सत्य जगासमोर आलं. कंगनाने सांगितलं की, आदित्य पंचोलीने अनेकदा तिचा लैंगिक अत्याचार केला आहे.