'पद्मावत' च्या या सीनमुळे दीपिका पदुकोण बैचेन

असंख्य वादांना तोंड देत संजय लीला भन्साळीचा ''पद्मावत'' हा सिनेमा प्रदर्शित झाला. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 27, 2018, 04:51 PM IST
'पद्मावत' च्या या सीनमुळे दीपिका पदुकोण बैचेन title=

मुंबई : असंख्य वादांना तोंड देत संजय लीला भन्साळीचा ''पद्मावत'' हा सिनेमा प्रदर्शित झाला. 

प्रेक्षकांनी पद्मावत या सिनेमाला अधिक पसंत केलं आहे. हा सिनेमा पूर्ण करण्यासाठी आणि परफेक्ट सिनेमा बनवण्यासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळीसोबतच कलाकारांनी भरपूर मेहनत केली आहे. संजय लीला भन्साळीसोबत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी सांगितलं आहे की, भन्साळीसोबत काम करणं सोपी गोष्ट नाही. 

पद्मावत या सिनेमाच्या शुटिंगसाठी जवळपास 1 सालावरून अधिक कालावधी लागला. या सिनेमासाठी अनेकांनी मेहनत केली आहे. दीपिका पदुकोणने राणी पद्मावतीचं कॅरेक्टर प्ले केलं आहे. रणवीर सिंह अल्लाऊद्दीन खिलजी साकारत आहे तर शाहिद कपूर राजा रावल रतन सिंहचं पात्र साकारलं आहे. 

राणी पद्मावत हे कॅरेक्टर प्ले करण्यासाठी दीपिका पदुकोणने भरपूर मेहनत केली आहे. नुकताच दीपिकाने एक ट्विटमध्ये म्हटलं आहे की, तिला या सिनेमातील कोणता सीन करणं अतिशय कठीण गेलं. रिपोर्टनुसार हा सिन साकारण्यासाठी दीपिका पदुकोण भरपूर डिप्रेस झाली आणि तिला नॉर्मल होण्यासाठी तिला भरपूर वेळ लागला.