प्रियंका चोप्राचा CAA ला कडाडून विरोध

जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थांना पाठिंबा 

Updated: Dec 19, 2019, 11:32 AM IST
प्रियंका चोप्राचा CAA ला कडाडून विरोध  title=

मुंबई : आयुष्मान खुराना, परिणीति चोप्रा यानंतर अभिनेत्री प्रियंका चोप्राने जामिया मिल्लिया इस्लामिया आणि अलीगढ मुस्लिम विद्यापाठीतील विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसेला विरोध केला आहे. प्रियंकाने ट्वीट करून आपला विरोध दर्शवला आहे. मुंबईतही आज CAA आणि NRC विरोधात भव्य मोर्चा देखील काढण्यात आला. 

प्रियंकाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की,'प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे हे एक स्वप्न आहे. महत्वाचं म्हणजे शिक्षणच प्रत्येकाला स्वतंत्रपणे विचार करायचा अधिकार देतो.' प्रियंकाने ट्विटवर ही नोट शेअर केली आहे. त्यांच्या बुलंद आवाजाला आपण पाठिंबा द्यायला हवा. लोकशाहीमध्ये तुम्ही शांततेत आवाज उठवलात तर त्याला हिंसाचाराला तोंड द्यावं लागत असेल, तर हे चुकीचं आहे, अशी भावना देखील प्रियंकाने व्यक्त केली. प्रत्येक आवाज महत्वाचा आहे आणि तोच आवाज बदलत्या भारताकरता महत्वाचा ठरेल, असे परखड मत प्रियंका चोप्राने व्यक्त केलं आहे.

प्रियंका चोप्राबरोबरच तिची बहीण परिणीति चोप्राने देखील विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसेला BARBARIC असं संबोधलं आहे. परिणीति ट्विटरवर म्हणते की,'जर एखाद्या मुद्यावर आवाज उठवला तर असे हाल होणार असतील. मग CAA तर विसरूनच जा. एक विधेयक पास करण्यासाठी आपल्याला भारताला लोकशाही देश म्हणणं विसरून जायला हवं. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यावर निर्दोष लोकांना मारलं जात आहे.'

प्रियंका चोप्रा, परिणीति चोप्राप्रमाणेच अभिनेता राजकुमार रावने देखील या हिंसेला विरोध केला आहे.

याप्रमाणेच अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, विक्की कौशल, पुल्कित सम्राट, रिचा चड्ढा, अनुभव सिन्हा, आलिया भट्ट या बॉलिवूड कलाकारांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे.