रणबीर कपूरचा 'संजू' सिनेमा Leak

या लिंकवर पाहता येईल हा सिनेमा 

रणबीर कपूरचा 'संजू' सिनेमा Leak  title=

मुंबई : रणबीर कपूरचा 'संजू' हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. या सिनेमाने पहिल्याच दिवशी भरपूर कौतुक आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनवर तगडी कमाई केली आहे. या सिनेमात रणबीर कपूरचं भरपूर कौतुक होतं आहे. असं सगळं असताना दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासाठी खूप वाईट बातमी आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा संजू हा सिनेमा सोशल मीडियावर लिक झाला आहे. सोशल मीडियावर युझर्सने स्क्रीन शॉर्ट्स शेअर केले आहेत. तसेच हा सिनेमा टोरंटवर डाऊनलोड करता लिंक उपलब्ध आहे. मात्र या लिक झालेल्या सिनेमाची प्रिंट कशी आहे किंवा हे खरं आहे की नाही हे मात्र अद्याप कळलेलं नाही.  

हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सिनेमा 400 स्क्रिनवर एकाचवेळी रिलीज करण्यात आली आहे. इतक्या स्क्रीनवर रिलीज होणारा हा दुसरा सिनेमा आहे. रेस 3 हा सिनेमा देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर रिलीज झाला आहे. हा सिनेमा 65 देशांत रिलीज झाला आहे. जगभरात हा सिनेमा 1300 स्क्रिनवर रिलिज झाला आहे. 

पहिल्याच दिवशी या सिनेमाने केली एवढी कमाई

सर्वाधिक ओपनिंग फिल्म ठरलेल्या संजू या सिनेमाने पहिल्याच दिवशी 32 करोड रुपयांच कलेक्शन केलं आहे. या सिनेमाची ओपनिंग बघता असा विचार केला जात आहे की, हा सिनेमा पुढच्या 3 दिवसांत 100 करोडचा आकडा पार करेल. सिनेमा समीक्षक रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजू हा सिनेमा यंदाचा सर्वात मोठी ओपनिंग करणारा सिनेमा ठरणार आहे. पहिल्याच दिवशी संजू या सिनेमाचं कलेक्शन 32 करोड रुपये झालं आहे. संजूने अगदी पहिल्याच दिवशी दबंग खानच्या रेस 3 या सिनेमाचा रेकॉर्ड तोडला आहे. 32 करोडच्या कलेक्शनसोबत संजू हा सिनेमा 2018 हा सर्वाधिक ओपनिंग फिल्म ठरला आहे.