'क्रिकेटचा देव'ही संयमीच्या बॉलिंग स्टाइलचा चाहता..म्हणाला, 'मी कधीच असं...'

Saiyami Kher bowling Stlye: क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अभिनेत्री संयमी खेरची भेट घेतली आहे. संयमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 22, 2023, 01:13 PM IST
'क्रिकेटचा देव'ही संयमीच्या बॉलिंग स्टाइलचा चाहता..म्हणाला, 'मी कधीच असं...' title=

Saiyami Kher bowling Stlye: सध्या घूमर सिनेमा आणि अभिनेत्री संयमी खेरची सर्वत्र चर्चा सुरु आहे. संयमीने आपल्या अभिनय आणि बॉलिंग स्टाइल साठी घेतलेल्या मेहनतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सगळीकडून तिचे कौतूक होत आहे. अशातच दुग्ध शर्करा योग संयमीच्या आयुष्यात आला आहे. क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अभिनेत्री संयमी खेरची भेट घेतली आहे. संयमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला. 

आपण लहानपणी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याची आनंदी भावना संयमी खेरने व्यक्त केली आहे. माझे गुरु, प्रेरणास्थान, शिक्षक..असे तिने सचिनला संबोधले आहे. क्रिकेट हा खेळ मी यांच्याकडे पाहूनच शिकले. यामुळेच मला क्रिकेटची गोडी निर्माण झाली. मी कॉलेज बंक करुन सचिनचे क्रिकेट पाहिले आहे. तसेच सचिन, सचिन ओरडायला आम्हाला आवडायचे, असेही ती म्हणाली. त्यामुळे सचिनसोबतची भेट माझ्यासाठी काय आहे हे शब्दात सांगू शकत नाही, असे ती म्हणाली. 

काय म्हणाला सचिन?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saiyami Kher (@saiyami)

मी सिनेमात तुझ्या हाताची अ‍ॅक्शन पाहिली. मला ती अ‍ॅक्शन तूला करताना पाहायचे आहे, असे सचिन म्हणाला. यानंतर तुमच्यासमोर ही अॅक्शन करताना माझ्यावर दडपण आल्याचे संयमीने सांगितले. यानंतर संयमी डाव्या हाताने बॉलिंग करुन दाखवली.  

संयमीची अ‍ॅक्शन पाहून सचिनने आश्चर्य व्यक्त केले. मी अशा अ‍ॅक्शनमध्ये कधीच  खेळलो नाही, असे तो म्हणाला. 

मी तिला विचारलं. त्यावरुन कळालं की, एकवर्षे तिने हात मागे घेऊन राहिली, हे करणं खूपचं कठीण आहे. तुम्ही करुन पाहिलात तर खूप त्रास होतो हे तुम्हाला जाणवेल, असे सचिनने यावेळी व्हिडीओमध्ये सांगितले. 

अभिनेत्री संयमी खेर हिने मिर्झा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने माऊली आणि इतर अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. गेल्यावर्षी आलेल्या 'फाडू' सिरीजमधील तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले. संयमीने आतापर्यंत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. आता घुमरमधून हात गमावलेल्या क्रिकेटरच्या भूमिकेत ती दिसत आहे.