सलमानने सांगितलं 'टाइगर जिंदा है'च्या हीट होण्याचं सिक्रेट

22 डिसेंबर 2017 ला रिलीज झालेल्या 'टायगर जिंदा है' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर अवघ्या काही दिवसांमध्येच धूमाकूळ घातला.

Updated: Jan 13, 2018, 08:36 AM IST
सलमानने सांगितलं 'टाइगर जिंदा है'च्या हीट होण्याचं सिक्रेट

मुंबई  : 22 डिसेंबर 2017 ला रिलीज झालेल्या 'टायगर जिंदा है' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर अवघ्या काही दिवसांमध्येच धूमाकूळ घातला.

जगभरात 500 कोटी आणि भारतात 311 कोटींहून अधिक कमाई करणार्‍या या चित्रपटाने  अनेक विक्रमही केले. सलमान खानच्या 'सुल्तान', 'बजरंगी भाईजान' नंतर 300 कोटींचा टप्पा पार करणारा 'टायगर..' हा त्याचा तिसरा चित्रपट ठरला आहे. पण 'टायगर..' च्या यशामागील गुपित सलमानने चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. 

सार्‍या वयातील लोकांना अपिल करणारी फिल्म  

सलमान खानच्या मते, 'ब्लॉकबस्टर बनण्यासाठी चित्रपटामध्ये चहत्यांचं मनोरंजन करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे. टायगर जिंदा है चित्रपट तरूण, लहान मुलं, वयस्कर मंडळी अशा आबालवृद्धांचं मनोरंजन करणारी होती. 
सोबतच लॉन्ग़ विकेंड , सुट्ट्या यांचं प्लॅनिंग करून चित्रपट रिलीज केल्याने त्याचा फायदा बॉक्सऑफिसवर दिसला. 

प्लॅनिंग सोबतच चित्रपटामध्ये झोया आणि टायगरची प्रेमकथा व जोडीला असणारा माणूसकीचा संदेश ही गोष्ट या चित्रपटाला सुपरहीट करणारी ठरली. 

मेहनतीचं फळं 

सलमान खानच्या मते चित्रपटाला हीट करण्यासाठी अनेक कारणं आहेत. पण त्याने कलाकारांसोबतच टीमच्या अन्य सदस्यांनाही श्रेय दिलं आहे. प्रत्येकाने काम करताना 200% दिले. याच मेहनतीचं फळं बॉक्सऑफिसवर दिसलं आहे. 

सिक्वेलची उत्सुकता  

2012 साली सलमान खानच्या ' एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजे ' टायगर जिंदा है' या दोन्ही भागांमध्ये त्यांनी अ‍ॅक्शन सीन्स केले आहेत. बर्फात कोल्ह्यांसोबत केलेली लढाई असो किंवा यापूर्वी न पाहिलेली अनेक लोकेशन्स असोत. यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close