'झिरो'च्या टीझरमुळे कॅन्सर पीडित आईच्या चेहऱ्यावर हास्य

काय म्हणाला शाहरूख?

'झिरो'च्या टीझरमुळे कॅन्सर पीडित आईच्या चेहऱ्यावर हास्य  title=

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानचा आगामी सिनेमा "झिरो"चा टीझर प्रदर्शित झाला आहे. ईदच्या सणाचं निमित्त साधून सलमान खानने ''रेस 3'' च्या माध्यमातून ईदी दिली आहे तर शाहरूख खानने 'झिरो'च्या टीझरमधून ईदी दिली आहे. चाहत्यांना जोर का झटका तेव्हा मिळाला तेव्हा त्यांनी सलमान - शाहरूखला एकत्र एकाच स्क्रीनवर पाहिलं. शाहरूख - सलमानला एकत्र बघून चाहते प्रचंड खूष झाले. बुटका शाहरूख खान सलमान खानच्या कडेवर बघून चाहत्यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दर्शवली. काही खास ट्विटवर शाहरूखने प्रतिक्रिया देखील दिल्या. त्यातील एक ट्विट खूप खास आहे. कारण त्या ट्विटने स्वतः शाहरूख देखली स्तब्ध झाला. 

शाहरूख -सलमानच्या एकत्र येण्यामुळे सामान्य प्रेक्षक खूप खूष झाले आहेत. शाहरूखने या खास ट्विटला रिप्लाय देखील केला आहे. त्यामुळे हा फॅन आणि त्याची कॅन्सरग्रस्त आई खूप खूष झाली आहे.

यश उपाध्याय नावाच्या व्यक्तीची आई कॅन्सरशी दोन हात करत आहेत. झिरोचा टीझर पाहून ही आई खूप हसली. याकरता तिचा मुलगा यशने शाहरूखचे आभार मानले आहेत. तो म्हणतो की, शाहरूख - सलमानला नाचताना बघून माझी आई खूप हसली. याकरता त्याने सलमान - शाहरूखला खूप धन्यवाद म्हटलं आहे. त्यावर शाहरूखने देखील रिप्लाय केला आहे. त्यांना सतत हसत राहण्यास सांगितलं आहे. मी त्या लवकरच बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करतो असं देखील शाहरूख बोलला आहे. झिरो हा सिनेमा ख्रिसमस सुट्यांमध्ये म्हणजे 21 डिसेंबर 2018 रोजी रिलीज होत आहे.