दीपिकाने अशा पुसल्या लग्नाअगोदर जुन्या प्रेमाच्या आठवणी ....

कुठे गायब झाला टॅटू? 

दीपिकाने अशा पुसल्या लग्नाअगोदर जुन्या प्रेमाच्या आठवणी .... title=

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल दीपिका आणि रणवीर सिंहने इटली लेक कोमोमध्ये लग्न केलं. लग्नानंतर जेव्हा दोघं रिसेप्शनकरता मुंबईवरून बंगलुरूला पोहोचले तेव्हा एअरपोर्टवर दीपिकाचा लूक बघून चाहते अगदी हैराण झालं. कारण तिच्यात मोठा बदल झाला होता. तिच्या मानेवरील टॅटू गायब झाला होता.... 

त्यामुळे आता चाहत्यांना पूर्ण विश्वास बसला आहे की, दीपिका तिच्या जुन्या प्रेमाला पूर्णपणे विसरली आहे. जुन्या प्रेमाची एक्स बॉयफ्रेंडची एकही आठवण तिने स्वतःजवळ ठेवलेली नाही. दीपिकाच्या मानेवर रणबीर कपूरच्या नावाचा टॅटू होता. मात्र आता हा टॅटू तिच्या मानेवर नाही. 

Image result for deepika tattoo on neck zee news

हा टॅटू तिने तेव्हा बनवला होता जेव्हा ती आणि रणबीर कपूर एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले होते. जेव्हा त्यांच नातं अतिशय चांगल होतं. हाच टॅटू बनवून तिने रणबीरजवळ आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. 

दीपिका त्यावेळी आपल्या अभिनयाबरोबरच टॅटूमुळे देखील खूप चर्चेत आली होती. दीपिका हा टॅटू अगदी आपल्या मानेवर तयार केला होता. यामुळे सगळ्यांच्या नजरा त्या टॅटूकडे जात असतं. पण आता हा टॅटू दीपिकाच्या मानेवरून गायब झाला आहे.