शाळेत असतानाही सलमानने घेतलेली 'त्या' मुलांच्या जेवणाची जबाबदारी; सोनाली बेंद्रनं सांगितला किस्सा

Sonali Bendre on Salman Khan: सलमान खान हा असा अभिनेता आहे जो कायमच आपल्या मित्रमैत्रिणींना आणि लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असतो. तुम्हाला माहितीये का की सलमाननंही शाळेत असताना 10 गरीब मुलांना मदत केली होती. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 24, 2023, 04:41 PM IST
शाळेत असतानाही सलमानने घेतलेली 'त्या' मुलांच्या जेवणाची जबाबदारी; सोनाली बेंद्रनं सांगितला किस्सा title=
June 23, 2023 | Sonali Bendre on Salman Khan says in an old talk show that salman adopted 10 children when he was in school

Sonali Bendre on Salman Khan: अभिनेता सलमान खान हा आपल्या बेधडक आणि सहज अभिनयासाठी ओळखला जातो. तो कायमच लोकांची मदत करताना दिसतो. आपल्या बिईंग ह्यूमनमधूनही तो अनेकांना मदत करतो. मोठमोठ्या कलाकारांनाही त्यानं फार मोठी मदत केली आहे. समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार असे कळते की, सलमान जेव्हा लहान होता तेव्हा पासूनच त्याला इतरांना मदत करण्याची इच्छा असायची. सध्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्यात तिनं सलमान खानची स्तुती केली आहे. सोनाली बेंद्रे ही लोकप्रिय हिंदी मराठी अभिनेत्री आहे. 90 च्या काळातील तिचे अनेक चित्रपट गाजले आहेत. त्यावेळी तिनं सलमान खानसोबतही अनेक लोकप्रिय चित्रपट केले आहेत. 

'हम साथ साथ हैं' हा असाच एक चित्रपट तेव्हा प्रचंड गाजला होता. त्यावेळी सलमान खान आणि सोनाली बेंद्रे यांनी या चित्रपटातून एकत्र काम केले होते. त्यावेळीची एक आठवण तिनं शेअर केली होती. एका टॉक शोच्या वेळी तिनं ही आठवण सांगितली होती. हा टॉक शो फार जुना आहे. परंतु हा कधीचा आहे याबद्दल काही फारशी माहिती नाही. परंतु सोशल मीडियावर हा व्हायरल होतो आहे. ज्यात ती म्हणाली की, ''जेव्हा सलमान हा 10 वर्षांचा होता तेव्हा ते एका ब्रांदाच्या क्रिश्चयन शाळेत शिकत होता. तेव्हा तिथे फार वेगवेगळ्या सोशल क्लासेसमधील मुलं शिकायला येत होती. ज्यांना घरी गेल्यावर योग्य खायला प्यायला मिळत नव्हते. याचे कारण असे होते की या मुलांचे पालक हे मेहनत करायचे आणि मजदूरी करायचे.''

त्यापुढे ती असं म्हणते की, ''तेव्हा शाळेतले फायर सलमान खानला असं म्हणाले होते की जर का यातील कुठल्याही एका मुलाला तू घरी घेऊन गेलास तर फारच बरं होईल कारण तसं झालं तर या मुलांना त्याचा फार फायदा होईल. तेव्हा सलमाननं या फादरला विचारलं की अशी एकूण किती मुलं आहेत. तेव्हा फादर म्हणाले की, 10 आणि 12 मुलं असतील. त्यावर सलमाननं फटदीशी उत्तर दिलं की नाहीच प्रोब्लेम नाही मी त्यांना माझ्या घरी घेऊन जाईन. तेव्हा ही मुलं सलमान खानच्या घरी जाऊन जेवायचे.''

हेही वाचा - कोण म्हणतं जुन्या 'रामायण'चा वाद नव्हता? सीतेच्या कट-स्लिव ब्लाऊजवरही होता आक्षेप, पाहा...

सध्या या व्हिडीओखालीही अनेक तऱ्हेचे कमेंट्स येताना दिसत आहेत आणि अनेक लोकं आणि चाहते हे सलमान खानचे कौतुक करताना दिसत आहेत.