कोण म्हणतं जुन्या 'रामायण'चा वाद नव्हता? सीतेच्या कट-स्लिव ब्लाऊजवरही होता आक्षेप, पाहा...

Ramayan Sita Costume Controversy: रामानंद सागर यांच्या सीतेवरही आक्षेप घेण्यात आले होते. खासकरून तिच्या कट-स्लिव्ह ब्लाऊजवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे सगळीकडेच त्याचीच चर्चा रंगली होती. तुम्हाला माहितीये का की यामुळे चक्क या मालिकेवर दोन वर्षे स्टेही आला होता. 

Updated: Jun 24, 2023, 09:09 PM IST
कोण म्हणतं जुन्या 'रामायण'चा वाद नव्हता? सीतेच्या कट-स्लिव ब्लाऊजवरही होता आक्षेप, पाहा... title=
June 23, 2023 | ramayan television serial sita cut sleeveless blouse controversy put the show on stay for two years

Ramayan Sita Costume Controversy: सध्या 'आदिपुरूष' या चित्रपटावरून वातावरण चांगलेच तापलेले दिसते आहे. अगदी व्हिएफएक्सपासून ते या चित्रपटातील संवादापासून सर्वांवरच प्रेक्षकांनी या चित्रपटातील गोष्टींवर आक्षेप घेतला आहे. त्यातून सीतेच्या वेशभूषेवरूनही अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. त्या काळी सीता माता ही इतके स्लिव्हलेस ब्लाऊज घालू शकत होती का? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता. त्यामुळे यावरूनही बराच गदारोळ माजला होता. परंतु तुम्हाला माहितीये का की फक्त आताच्या आदिपुरूषलाच नाही तर रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेलाही या वादाचा फटाका बसला होता. त्यामुळे या मालिकेवर दोन वर्षे बंदी घालण्याची मागणी केली होती. तुम्हालाही ही गोष्ट कदाचित जाणून घेऊन आश्चर्य वाटेल. परंतु हो हे खरं आहे. 

'आज तक'ला सुनील लहरी ज्यांनी रामायण या मालिकेतील लक्ष्मणाची भुमिका केली होती त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ''आज ज्याप्रकारे आदिपुरूषला प्रेक्षकांचा विरोध आहे. आमच्यावेळही रामायण ही मालिका करताना टेलिकास्टला घेऊन खूप काही करावे लागले होते. त्यावेळी आमच्या मालिकेच्या टेलिकास्टवरून एका मोठ्या मुद्यावरून बॅन आला होता. त्यावेळी खूप छोट्या छोट्या गोष्टींवर नजर ठेवली गेली होती. त्यातून इंडियन ब्रॉडकास्ट मिनिस्ट्रीचेही यात लक्ष होते.''

त्यापुढे ते म्हणाले की, ''जेव्हा रामानंद सागर यांनी कास्टिंगसाठी तीन पायलट शूट केले होते. त्यावेळी सरकार ही मालिकेच्या प्रदर्शनावरूनही खूप सतर्क झाली होती. त्यांना यामध्ये कोणतीच चूक नको होती कारण इतिहासात पहिल्यांदाच रामायण हे हिंदी टेलिव्हिजन माध्यमातून दाखवले जाणार होते. तेव्हा या पायलट शूटमध्ये मिनिस्ट्रीनंही डोकं घातलं होतं. त्यांनी या शूटवर अनेक मुद्दे उपस्थित केले होते. तेव्हा आम्हाला असं वाटतं होतं की ते या शोला टाळतायत. तर रामानंद सागर यांना ही मालिका आणायची होती.''

हेही वाचा - अवघ्या 14 महिन्यांचं लेकरु पहिल्यांदाच आईपासून दूर; लेकीला पाहून देबिना बॅनर्जीच्या डोळ्यात पाणी

''मिनिस्ट्रीच्या लोकांनी सांगितले की सीतेचा ब्लाऊज हा कट-स्लिव्हजचा ब्लाऊज नाही घालू शकत. ते म्हणाले की, दूरदर्शनवाल्यांनीही यावर आक्षेप घेतला होता. त्यांनीही हा शो टेलिकास्ट करण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर हा कॉश्चुम फुल स्लीवचा केला आणि मग त्यानुसार साडीचा कॉश्चुम केला. याच कारणामुळे हा शो होल्डवर ठेवण्यात आला होता.'' असं ते म्हणाले. 'आदिपुरूष' या चित्रपटानंही मोठी कमाई केली आहे. 500 कोटी रूपयांच्या या चित्रपटानं आतापर्यंत 450 कोटी जगभरात कमावले आहेत.