दक्षिणी भाषेचा तडका असलेलं 'टकामका' सोशल मीडियात चर्चेत

दक्षिणी भाषेचा तडका असलेलं टकामका हे सॉन्ग सध्या सोशल मीडियात चर्चेत 

Updated: Sep 22, 2019, 02:35 PM IST
दक्षिणी भाषेचा तडका असलेलं 'टकामका' सोशल मीडियात चर्चेत title=

मुंबई : दक्षिणी भाषेचा तडका असलेलं टकामका हे सॉन्ग सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. मराठी अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री मयुरी शुभानंदा यांच्या नृत्याची झलक यामध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांतच या गाण्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत. या गाण्यामध्ये संग्राम साळवी हा तुम्हाला दक्षिणी पेहरावात दिसतो.

'आण्णा रे आण्णा तु लावलास चुना का गुडघ्या बाशिंग बांधल....करुन सवरून वसाड्या बघतो कसा ?..टकामका' असे या गाण्याचे बोल आहेत. काही दाक्षिणात्य शब्द या गाण्यात आणखी रंगत आणतात.

प्रसाद आप्पा तारकर यांनी 'टकामका' या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे.

राहुल शेट्ये हे या गाण्याचे नृत्य दिग्दर्शक असून प्रविण कुंवर यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. 

कौतुक शिरोडकर यांनी या गाण्याचे शब्द लिहीले असून भारती माधवी यांनी हे गाणं गायलं आहे.