Anupam Kher यांना कळलंय दाक्षिणात्त्य अन् हिंदी इंडस्ट्रीचं जळजळीत सत्य? तुम्ही कधी विचारही केला नसेल...

एकामागून एक हिंदी चित्रपट बॉयकॉट करण्याच्या मागण्या वाढू लागल्या आहेत.

Updated: Aug 26, 2022, 04:24 PM IST
Anupam Kher यांना कळलंय दाक्षिणात्त्य अन् हिंदी इंडस्ट्रीचं जळजळीत सत्य? तुम्ही कधी विचारही केला नसेल...  title=

मुंबई: हे वर्ष उजाडलं ते अनेक वाद घेऊनच. त्यात सिनेसृष्टीशी संबंधित वाद तर अगदी शिगेलाच पोहोचले. किरण माने (Kiran Mane), केतकी चितळे (Ketki Chitale), बॉलीवूड Vs साऊथ इंडियन बॉक्स ऑफिस (Bollywood Vs South Indian Box Office) इत्यादी. आता हे वर्ष संपत आलंय तरीसुद्धा हे वाद काही कमी होण्याचं नावं घेत नाहीत. त्यात या वादांना फोडणी मिळाली आहे ती बॉयकॉट (Boycott) या ट्रेण्डची. (veteran bollywood actor anupam kher reveals that south film industry tell stories and bollywood sell stars interview goes viral)

एकामागून एक हिंदी चित्रपट बॉयकॉट करण्याच्या मागण्या वाढू लागल्या आहेत. 'लाल सिंग चड्ढा'नंतर (Laal Singh Chaddha), 'विक्रम वेढा', 'जवान', 'पठाण', 'लायगर', 'दोबारा', 'ब्रम्हास्त्र' (Bramhastra), 'टायगर 3' (Tiger 3), 'डार्लिंग्स' (Darlings), 'रक्षाबंधन' असे हिंदी चित्रपट बॉयकॉट करण्याच्या मागण्या प्रेक्षकांनी केल्या. सोशल मीडियावर हा ट्रेण्ड इतका जोरात फिरू लागला की शेवटी बॉलीवूड कलाकारांनाही या बॉयकॉटवर बोलणं भागच झालं. 

सध्या वातावरण अजूनही थंड झालेले नाही. त्यात आता नवीन वाद सुरू झालाय तो म्हणजे हिंदी आणि दाक्षिणात्त्य चित्रपटांचा. हा वाद तसा जूनाच असला तरी या दोन इंडस्ट्री एकाच रेषेत जाणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांची तुलना होणे स्वाभाविकच आहे. परंतु याच मुद्दयावर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी मात्र एक खळबळ जनक वक्तव्य केले आहे. 

गेल्या काही महिन्यांत हिंदीपेक्षा प्रादेशिक म्हणजेच दाक्षिणात्त्य चित्रपटांनी मोठी कमाई केली. त्यात मराठी चित्रपटांचाही समावेश होता. यापैंकीच एक चित्रपट गाजला आणि तो म्हणजे 'द काश्मिर फाईल्स' (The Kashmir File). या चित्रपटात अनुपम खेर यांनी महत्त्वाची भुमिका निभावली होती. आता त्यांचा 'कार्तिकेय 2' हा तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत दाक्षिणात्त्य आणि हिंदी इंडस्ट्रीबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

या मुलाखतीत त्यांनी दाक्षिणात्त्य चित्रपटांचे कौतुक केले आणि म्हणाले, ''दाक्षिणात्त्य इंडस्ट्रीत कथा सांगितल्या जातात तर हिंदी इंडस्ट्रीत म्हणजे बॉलीवूडमध्ये स्टार विकले जातात.''

बॉलीवूड म्हणजे हॉलीवूडची नक्कल 
अनुपम खेर म्हणाले की, ''हिंदी सिनेमा हा हॉलीवूडची (Hollywood) नक्कल करतो. पण दाक्षिणात्त्य सिनेमे मात्र हॉलीवूडची नक्कल करत नाहीत. त्यामुळे इथे स्टारच विकले जातात तर तिथे कथा सांगितल्या जातात म्हणून ते सर्वात पुढे आहेत.''

नुकताच 'कार्तिकेय 2' (Kartikey 2) हा तेलगू चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने 'लाल सिंग चड्ढा', 'रक्षाबंधन' आणि 'दोबारा' यांना मागे टाकले आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांचीही महत्त्वपुर्ण भुमिका आहे. 2014 साली आलेल्या 'कार्तिकेय' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.