ज्याच्यावर प्रेम केलं, त्यानंच पत्नीसमोर Zeenat Aman यांच्यावर उगारला हात; वाचून विश्वासच बसणार नाही

Zeenat Aman यांनी अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. हे चित्रपट पाहता झीनत अमान यांनी त्यांच्या आयुष्यात काही वाईट गोष्टींचा सामना केला असेल असं कोणालाही वाटलं नाही. पण झीनत अमान यांच्यासोबत त्यांची पती संजय खान यांनी जे केलं ते ऐकूण अनेकांना धक्का बसला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 10, 2023, 12:50 PM IST
ज्याच्यावर प्रेम केलं, त्यानंच पत्नीसमोर Zeenat Aman यांच्यावर उगारला हात; वाचून विश्वासच बसणार नाही title=
(Photo Credit : Social Media)

Zeenat Aman : बॉलिवूडच्या 70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे झीनत अमान. झीनत अमान या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. झीनत अमान यांच्या क्लासिक आणि कूल लूकचे लाखो चाहते होते. झीनत अमान यांचं करिअर तर चांगलच गाजलं होतं. त्या करिअरमुळे जेवढ्या चर्चेत होत्या. तितक्या त्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील होत्या. त्यांचं खासगी आयुष्य कधी स्थिरावलं नाही. त्यांनी करिअरमध्ये एका मागे एक हीट चित्रपट दिले. करिअरच्या शिखरावर गेल्या. मात्र, कधीच त्यांना खासगी आयुष्यात स्थिरताही मिळाली नाही. झीनत यांनी 1978 साली संजय खान यांच्याशी लग्न केलं. पण तुम्हाला माहितीये का संजय खान यांनी झीनत अमान यांच्यासोबत असं काही केलं की जे ऐकूण तुम्हाला धक्का बसेल. 

झीनत अमान होत्या 'मिस एशिया पॅसिफिक स्पर्धा' 

झीनत अमान 1970 साली वयाच्या 19 व्या वर्षी 'मिस एशिया पॅसिफिक स्पर्धा' जिंकल्या. त्यानंतर झीनत अमान या अभिनेत्री झाल्या. झीनत अमान यांनी चित्रपट करताच एकामागे एक हीट चित्रपट दिले. त्यानंतपर 1978 साली झीनत अमान यांनी अभिनेता संजय खान यांच्याशी लग्न केलं. त्यांच्या लग्नानंतर त्या दोघांमध्ये वाद सुरु झाले. त्यांच्यातील ही कटुता पाहता सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. संजय खान हे झीनत अमान यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करायचा. एका हॉटेलमध्ये संजय खान यांनी झीनत यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हे जेव्हा समोर आलं तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसला आणि एकच खळबळ उडाली होती. 

झीनत यांनी एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला होता. झीनत त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोणावळा गेल्या होत्या. तर मुंबईत ‘अब्दुल्ला’ या चित्रपटात अभिनयासोबत दिग्दर्शन करत असलेल्या संजय खान यांनी झीनत यांना गाण्यातील एक राहिलेला भाग शूट करण्यासाठी बोलावले. पण, झीनत यांनी त्यासाठी निर्मात्यांना नकार दिला. कारण त्यांनी आधीच काही निर्मात्यांना तारखा दिल्या होता. 

हेही वाचा : रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिली The Kerala Story ची पटकथा? Video शेअर करत मराठमोळ्या अभिनेत्याचा दावा

इतकं करूनही झीनत संजय यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी मुंबईत आल्या. त्यानंतर झीनत यांना मुंबईत आल्यावर कळले की संजय त्यांची पत्नी जरीनसोबत ताज हॉटेलमध्ये पार्टी करत आहेत. आता झीनत या हॉटेलमध्ये पोहोचल्याचे संजय खान यांना कळले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांना पत्नीच्या उपस्थितीत भेटण्यासाठी आल्या आहेत. त्यानंतर संजय यांचा स्वत: वरचा ताबा सुटला आणि त्यांनी झीनत यांना हॉटेलमध्ये बेदर मारहाण केली. त्यावेळी संजय यांनी झीनत यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय खान यांची पत्नी जरीन यांनी झीनत यांना पतीनं मारहाण केली हे पाहता त्यांना थांबवण्याचा प्रयत्न न करता त्यांचे कौतुक केले. दरम्यान, संजय खान यांनी इतकं मारूनही झीनत यांनी पती संजय यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे त्यांची पोलिसात तक्रार केली नाही आणि झीनत यांनी संजय यांना माफ केले.