The Kerala Story : 'द केरला स्टोरी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शनानंतर सतत त्याचा विरोध करण्यात येतोय. चित्रपटावर अनेकदा आक्षेप केल्यानंतरही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. हा चित्रपट पाहता अनेकांनी या चित्रपटाला केरळ राज्याविरोधातील प्रोपगंडा असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटात जो दावा करण्यात आला आहे तो सिद्ध करुन दाखवणाऱ्याला एक कोटी रुपयांचं बक्षिस देऊ असा दावा केरळातील एका मुस्लीम संघटनेनं केला आहे. त्यावर आता अभिनेता योगेश सोमण यांनी हा चित्रपट रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’मधील एका श्लोकाशी जोडला आहे. याविषयी सांगतान त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
योगेश सोमण यांनी द केरला स्टोरी विषयी बोलतानाचा हा व्हिडीओत त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत 'दोन दिवसांपूर्वी ‘द केरला स्टोरी’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर इंटरनेट आणि इतर माध्यमातून या चित्रपटावरून गदारोळ झाला. काहीजणांनी या चित्रपटाचं गांभीर्य लोकांना सांगितलं. तर काहीजणांनी चित्रपटाची सत्य आणि असत्यता याबाबत आपले विचार मांडले. पण अचानक माझ्या हाती रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’ मधील चार ओळी लागल्या आहेत. मी तर म्हणतो, ‘द केरला स्टोरी’ची ‘वन लाइन’ कथा शेकडो वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामी यांनी लिहून ठेवली आहे.'
#समर्थ_रामदास_स्वामी#TheKerlaStory pic.twitter.com/c5bCnME2Dy
— Yogesh Soman (@shriyogeshwar) May 8, 2023
पुढे तो श्लोक सांगत योगेश सोमण म्हणाले, 'किती गुजरीणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या । किती शांबूखी जहाजी फाकविल्या । किती एक देशांतरी त्या विकिल्या । किती सुंदरा हाल होवोनि मेल्या।।'
रामदास स्वामी यांचा हा श्लोक सांगत योगेश सोमण म्हणाले, ‘अस्मानी सुलतानी’मधील या श्लोकाच्या या चार ओळींमध्ये द केरला स्टोरीची कथा दाखवण्यात आली आहे. पुढे या श्लोकातील शब्दांचा अर्थ सांगत योगेश सोमण म्हणाले, ‘शांबूखी’ हा शब्द’शहामुखी’ या शब्दाचा अपभ्रंश आहे, ‘किती शांबूखी जहाजी फाकविल्या’ म्हणजे ‘किती शहामुखी जहाजा पाठवल्या. रामदास स्वामींनी चार ओळीतून संपूर्ण ‘द केरला स्टोरी’ची कथा शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवली आहे,' असं योगेस सोमण म्हणाले.
हेही वाचा : The Kerala Story : 'सडक्या विचारांना फाशी देण्याची गरज,' फडणवीसांचे जितेंद्र आव्हाडांना सणसणीत उत्तर
द केरला स्टोरी या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा, सिद्धि इडनानी, योगिता बिहानी आणि सोनिया बलानी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे.