व्हिडिओ गेम्स खेळणं कोकेन, जुगाराच्या व्यसनाइतकच धोकादायक!

.....

Updated: Jun 19, 2018, 10:16 AM IST

मुंबई: मोबाईलवर व्हिडिओ गेम्स खेळणाऱ्या सर्वांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. व्हिडिओ गेम्स खेळणं हे कोकेन आणि जुगाराच्या व्यसनाइतकच धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य परिषदेनं म्हटलंय. इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजेस या  नीयतकालीकाच्या अकराव्या आवृत्तीमध्ये  व्हिडिओ गेम्सचा अतिवापर हा मानसिक रोग असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

'... ही तर मानसिक रोगाची लक्षण'

व्हिडिओ गेम्सपासून दूर राहु न शकणे, खेळ मध्येच थांबवता न येणे, गेम खेळत असताना इतर कशाचेही भान न राहणे अशी या मानसिक रोगाची लक्षण आहेत. ही लक्षणं साधारण वर्षभर दिसल्यास मनसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असं जागतिक आरोग्य परिषदेनं म्हटलंय.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या... 

दरम्यान, तुम्हालाही मोबाईल गेम्स घेळण्याची सवय असेल तर, वेळीच सावध व्हा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या...