शुद्ध गायीच्या तुपाचे जबरदस्त फायदे

तुपामुळे वजन वाढत असल्याचा अनेकांचा समज आहे, पण...

Updated: Aug 18, 2020, 04:12 PM IST
शुद्ध गायीच्या तुपाचे जबरदस्त फायदे  title=
संग्रहित फोटो

मुंबई : आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेलं तूप अनेकांना आवडत नाही. तुपामुळे वजन वाढत असल्याचा अनेकांचा समज आहे. पण जेवणाची चव वाढवण्यासह शुद्ध तूपाचे अनेक फायदे आहेत. एका संशोधनानुसार, गायीचं तूप शरीरात (Cow ghee benefits)असे काही घटक, तत्व तयार करतं, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. 

गायीच्या शुद्ध तुपामुळे Desi ghee benefits लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. शुद्ध गायीच्या तुपात एन्टीऑक्सिडेंट Antioxidant, एन्टीबॅक्टेरियल Antibacterial आणि व्हिटॅमिन Vitamin असतात, जे शरीराला संसर्गापासून Infections वाचवतात. हे सर्व तत्व शरीरातील टॉक्सिन पदार्थ अर्थात विषारी द्रव्य बाहेर काढतात. 

'या' समस्या असल्यास हळदीचं दूध पिऊ नका

- गायीच्या शुद्ध तुपाचे काही थेंब नाकात टाकल्याने ऍलर्जी कमी होण्यास मदत होते.
- तुपामुळे टाईप-2 डायबिटीसपासून दूर राहता येतं. 
- शुद्ध गायीचं तूप लठ्ठपणा कमी होण्यास फायदेशीर ठरतं.
- गायीच्या तुपात व्हिटॅमिन 'के' Vitamin k असतं. त्याशिवाय मिनरलही असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास, इम्युनिटी मजबूत करण्यास मदत करतात.
- वजन खूप असल्यास तूप खाण्यापासून लांब जाऊ नका, तर तुपाचा डाएटमध्ये समावेश करा. गायीचं शुद्ध तूप वजन न वाढवता ते नियंत्रणात ठेवतं.
- तूप आणि खडीसाखर एकत्र खाल्याने दारु, भांग, गांजाची नशा कमी होण्यास मदत होते.
- गायीच्या तूपाचे काही थेंब नाकात टाकल्याने केस गळणं कमी होऊ शकतं. त्याशिवाय नवीन केसही येण्यास मदत होते.
- हाता-पायाची जळजळ होत असल्यास गायीच्या तुपाने, पायाच्या तळव्यांना मालिश केल्यास जळजळ कमी होण्यास मदत होते.