Diabetes Feet Symptoms : रक्तातील साखर वाढल्यावर सर्वात आधी पायात दिसतात हे बदल

Diabetes Symptoms : पायात जर 'हा' बदल दिसून आला तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तपासणी करा,कारण हे लक्षण तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढलयं हे सांगणारसुद्धा असू शकतं. 

Updated: Feb 20, 2023, 03:14 PM IST
Diabetes Feet Symptoms : रक्तातील साखर वाढल्यावर सर्वात आधी पायात दिसतात हे बदल  title=

Diabetes Symptoms in feet : मधुमेह (diabetes) हि आजकाल जगभरात सर्वात मोठी समस्या बनली आहे. जगभरातील बरेच लोक मधुमेह सारख्या आजारांनी त्रस्त आहेत. रक्तात साखरेचं प्रमाण वाढलं (increses blood sugar) कि मधुमेहाचा त्रास सुरु होतो. आणि या त्रासासोबत अनेक इतर समस्या उदभवतात. 
पण तुम्हाला माहित आहे का मधुमेह आणि पायाच वेगळंच कनेक्शन आहे शुगर वाढली  कि आपल्या पायात अनेक काही लक्षण दिसून येतात. (blood sugar incresed feets gives you symptoms first )

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने पायातील नसा आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. पायातील नसांच बराच नुकसान होतं. आणि या स्थितीला डायबेटिक न्यूरोपॅथी (diabetics symptoms) म्हणतात, ज्यामध्ये पाय सुन्न होणे, मुंग्या येणे, वेदना होणे किंवा अनुभवण्याची क्षमता कमी होणे सुरू होते. (blood sugar incresed feets gives you symptoms first )

जेव्हा रुग्णाला पायाचे दुखणे अनुभवता येत नाही, तेव्हा त्या रुग्णाला पायाला झालेली इजा, जर कुठे कात झालं तर त्याची जाणीव होत नाही. पायांमध्ये संवेदना (Sensitivity in legs) कमी झाल्यामुळे, पाय दुखणे किंवा इतर लक्षणच जाणीव कमी होऊ लागते अशात जखम झाली तर ती पटकन भरून निघत

नाही आणि त्यामुळे उर्वरित पायात इन्फेक्शन होऊ नये म्हणून पाय सुद्धा कापावा लागतो परिणामी कापल्या गेल्यामुळे पाय खराब होतात.रक्तातील साखर वाढली की पायात ही ३ लक्षणे दिसतात (diabetics when sugar incresed feets gives you symptoms first )

रक्तातील साखर वाढली की पायात ही ३ लक्षणे दिसतात

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की पायाला सूज येऊ लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पायांना सतत सूज येणे हे साखर वाढण्याचे लक्षण आहे.

पायाला जखम भरण्यासाठी बराच वेळ लागणे हे देखील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे लक्षण आहे.

पाय सुन्न होणे हे देखील उच्च रक्तातील साखरेचे लक्षण आहे. (blood sugar incresed feets gives you symptoms first )