सकाळी रिकाम्या पोटी हे ५ पदार्थ खाऊ नका

सकाळी-सकाळी ऑफिसला निघण्याच्या गडबडीत आपण रिकाम्या पोटी काहीही खाऊन बाहेर निघतो. 

Updated: Nov 13, 2018, 12:04 AM IST
सकाळी रिकाम्या पोटी हे ५ पदार्थ खाऊ नका title=

मुंबई : सकाळी-सकाळी ऑफिसला निघण्याच्या गडबडीत आपण रिकाम्या पोटी काहीही खाऊन बाहेर निघतो. मात्र तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. असे काही पदार्थ आहेत जे कधीही सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत. 

सकाळी रिकाम्या पोटी कधीही हे ५ पदार्थ खाऊ नका

मसालेदार पदार्थ - कधीही सकाळी रिकाम्या पोटी मसालेदार पदार्थ खाऊ नका. यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. तसेच अल्सरचाही त्रास संभवू शकतो. 

सॉफ्ट ड्रिंक - सॉफ्ट ड्रिंक्स कधीही रिकाम्या पोटी घेऊ नये. यात मोठ्या प्रमाणात कार्बोनेट अॅसिड असते. ज्यामुळे गॅसचा त्रास होऊ शकतो. 

थंड पदार्थ - रिकाम्या पोटी चुकूनही थंड पदार्थ खाऊ नका अथवा थंड पेय पिऊ नका. याबदल्यात गरम ग्रीन टी अथवा कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा. 

आंबट फळे - सकाळी रिकाम्या पोटी संत्री, लिंबू, पेरु ही फळे खाऊ नका. यामुळे पोटात अॅसिड वाढण्याची शक्यता असते. 

कॉफी - तुम्हाला जर रिकाम्या पोटी कॉफी घेण्याची सवय असेल तर ही सवय लगेच बंद करा. यामुळे तुम्हाला दिवसभर अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.