हे ५ पदार्थ वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतील!

वाढते वजन आरोग्याच्या इतर समस्यांना कारणीभूत ठरते. 

Updated: Mar 13, 2018, 01:39 PM IST
हे ५ पदार्थ वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतील!

मुंबई : वाढते वजन आरोग्याच्या इतर समस्यांना कारणीभूत ठरते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणे हे आजकालच्या बैठ्या जीवनशैलीत फार आव्हानात्मक ठरते. वजन कमी करण्याचे कठीण काम काहीसे सहज होण्यास हे ५ पदार्थ मदतगार ठरतील. 

अंड्याचा व्हाईट भाग

अंड्याच्या व्हाईट भागात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात आणि कार्बोहाइड्रेट कमी प्रमाणात असतात. वजन कमी करताना शरीराला प्रोटीन्सची खूप आवश्यकता असते. त्यामुळे आहारात अंड्याचा व्हाईट भाग नक्की घ्या. 

 

ब्राऊन ब्रेड

ब्राऊन ब्रेडमध्ये व्हाईट ब्रेडच्या तुलनेत अधिक फायबर्स असतात. त्यामुळे त्यातून कॅलरिज अधिक वाढत नाहीत. पचनक्रियेत याचा फायदा होतो. त्याचबरोबर कोलेस्ट्रोलची पातळी कमी होते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. ब्राऊन ब्रेड खाल्याने खूप वेळ भूक लागत नाही. परिणामी इतर काही खाल्ले जात नाही आणि वजन कमी होण्यास मदत होते.

फळं

आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी कार्बोहाइड्रेटची आवश्यकता असते. जे फळातून योग्य प्रमाणात मिळते. त्याचबरोबर शरीराला ऊर्जा मिळते. फळांमुळे गोड खाण्याची इच्छा कमी होते. 

हिरव्या पालेभाज्या

आहारतज्ञ देखील हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला वारंवार देत असतात. कारण यात कमी कॅलरीज असतात. फॅट्स नसतात आणि अधिक प्रमाणात फायबर, व्हिटॉमिन सी, व्हिटॉमिन के, फोलेट व कॅल्शियम हे पोषकघटक असतात. त्यामुळे या सगळ्याचा लाभ घेण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.

दही

दह्यातील कॅल्शियममुळे शरीरातील कोलेस्ट्रोल पंपिंगला आळा बसतो. त्याचबरोबर तुमची पचनक्रीया सुधारते. रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. दही प्रोटीन्स व व्हिटॉमिन्सचा उत्तम स्त्रोत आहे. वजन कमी करण्यासाठी दह्याचा आहारात अवश्य समावेश करा. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close