पहिल्यांदा सेक्स करताय? असं निवडा कंडोम

एकमेकांशी जवळीक साधणे हा प्रेम व्यक्त करण्याच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो.  पहिल्यांदा शारिरीक संबध प्रस्थापित करताना कोणत्या प्रकारचे कंडोम वापरावे असा प्रश्न अनेकांना पडतो. 

Updated: May 10, 2023, 10:55 PM IST
पहिल्यांदा सेक्स करताय? असं निवडा कंडोम title=

How to Select Condom : शब्दात व्यक्त न करता येवू शकणारी भावना म्हणजेच प्रेम. एकमेकांच्या प्रेमात असेली जोडपी कधी एकमेकांशी एकरुप होतात त्यांचे त्यांनाच कळत नाही. सेक्स हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत खाजगी क्षण. आयुष्यात कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करताना त्याची उत्सुकता काही वेगळीच असते. असंच काहीसं सेक्स बाबतीत देखील होते. आयुष्यात पहिल्यांदा सेक्स करताना अनेक प्रश्न मनात असतो. पुरुषांना एक प्रश्न नेहमीच पडतो तो म्हणजे योग्य कंडोम कसं निवडावे. 
नात्यांतील विश्वास वाढवण्यासाठी तसेच नाते संबधातील प्रेम भावना अधिक घट्ट करण्यासाठी सेक्स अर्थात शारिकीक संबध अत्यंत महत्वाचे मानले जातात. पहिल्यांदा शारिरीक संबध ठेवताना काही गोष्टींची खबरदारी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. यात कंडोम ही महत्वाची बाब मानली जाते. यामुळे शारिरीक संबध ठेवताना योग्य कंडोम निवडणे अत्यंत गरजेचे आहे. 

सुरक्षित सेक्ससाठी कंडोमचा वापर 

सुरक्षित सेक्ससाठी कंडोमचा वापर करणे गरजेचे आहे. लैंगिक आजारांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी कंडोमचा वापर करणे गरजेचे आहे. फॅमिली प्लानिंसाठी कंडोमचा वापर केला जातो. गर्भधारणा टाळण्यासाठी देखील कंडोमचा वापर केला जातो. कंडोम वापरण्याचा आणकी एक फायदा म्हणजे यामुळे लैंगिक संबंधाची वेळ वाढवून आणखी आनंद घेता येवू शकतो. आयुष्यात पहिल्यांदा सेक्स करताना योग्य कंडोम निवडने महत्वाचे आहे. 

कंडोमचा आकार

योग्य आकाराचे कंडोम निवडणे अत्यंत गरजेचे आहे. चुकीच्या साईजचे कंडोम निवडल्यास सेक्स करताना कंडोम फाटू शकते. यामुळे सेक्स करताना अडथळा येवू शकतो. बुहतेक कंडोमच्या पाकिटांवर त्यांचा आकार नमूद केलेला असतो. 

कंडोमचे मटेरियल

कंडोमचे मटेरियल देखील विचारात घेणे गरजेचे आहे. तुमच्या स्कीनला कोणत्या मटेरियलचे कंडोम सुट होते हे एकदा तापासून घ्या. अनेकांना कंडोमच्या काही मटेरियलमुळे एलर्जी होते. अशा स्थितीत non-latex condom वापरावे. 

कंडोमचा जाडपणा

साईज आणि आकारासह कंडोमचा जाडपणा देखील तपासला पाहिजे. बहुतांश लोक हे अत्यंत पातळ आकाराच्या कंडोमला पसंती देतात. अलीकडे अल्ट्राथिन कंडोमची मागणी वाढली आहे. 

टेक्सचर्ड कंडोम

टेक्सचर्ड कंडोम हे  प्लेन फिनिश पासून टेक्सचर्ड आउटर लेयर अशा विविध प्रकारांमध्ये मिळतात. मात्र, पहिल्यांदा सेक्स करताना बहुतांश लोक प्लेन कंडोम निवडतात. 

फ्लेवर कंडोम

पहिल्या सेक्सचा अनुभव अत्यंत रोमँंटिक तसेच एक्ट्रीम असावा असे अनेकांना वाटते. यामुळे अनेक जण फ्लेवर कंडोम निवडतात.