सकाळच्या एक्सरसाईजनंतर किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे? जाणून घ्या

परंतु तुम्ही कधी विचार केला आहे की, व्यायाम केल्यानंतर किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे. 

Updated: Apr 13, 2022, 07:32 AM IST
सकाळच्या एक्सरसाईजनंतर किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे? जाणून घ्या title=

मुंबई : व्यायाम किंवा वर्कआऊट केल्यानंतर आपल्याला प्रचंड घाम येतो. यावेळी आपण श्वासही जोरात घेऊ लागतो ज्यामुळे घसा कोरडा होतो आणि आपल्याला तहान लागते. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे की, व्यायाम केल्यानंतर किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे. 

एक्सरसाईजनंतर किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे?

व्यायामानंतर डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसांत ज्यावेळी पारा जास्त असतो. डिहायड्रेशनची लक्षणं टाळण्यासाठी, तुम्ही व्यायामाच्या 2 तासांच्या आत पाणी प्यायलं पाहिजे. 

व्यायाम किंवा वर्कआऊट झाल्यानंतर तुम्ही 500 मिली ते एक लिटर पाणी घेऊ शकता. वर्कआऊट करताना संबंधित नियमांचेही पालन करावं. अन्यथा व्यायामाचा शरीरावर चांगला नाही तर वाईट परिणाम होतो. 

एक्सरसाईजनंतर त्वरित पाणी पिणं टाळावं

व्यायामामुळे शरीरातील उष्णता संतुलित करण्यासाठी लोक व्यायामानंतर तातडीने पाणी पितात. परंतु ही पद्धत चुकीची आहे. व्यायामानंतर तुम्ही पाण्याचे सेवन करू शकता, परंतु व्यायामानंतर लगेचच पाणी पिणं टाळावं. जर तुम्ही अचानक पाणी प्यायलं तर तुम्हाला छातीत दुखणं, पोटदुखी, उलट्या असे त्रास जाणवू शकतात.

एक्सरसाईजनंतर किती वेळाने पाणी प्यायलं पाहिजे?

30 ते 35 मिनिटांच्या व्यायामानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. हे शरीराचं तापमान सामान्य करण्यास मदत करतं. हे नियम तुमच्या प्रत्येक प्रकाराच्या व्यायामासाठी फायदेशीर आहेत. 

त्याचप्रमाणे व्यायामानंतर डिहायड्रेशन टाळण्यासाठी ज्युस, चहा किंवा कॉफी घेऊ नका. पाण्याव्यतिरिक्त, तुम्ही नारळपाणी घेऊ शकता किंवा ग्रीन टी घेऊ शकता. यात्र यामध्ये किमान अर्ध्या तासाचा ब्रेक द्या.