डेड स्किनमुळे चेहरा काळवंडलाय..एकदाच करा हा उपाय..मिळवा नितळ तजेलदार त्वचा

डागविरहीत चेहऱ्यासाठी बेकिंग सोडा खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळल्यास याचा फायदा अधिक दिसून येतो. 

Updated: Nov 14, 2022, 06:32 PM IST
डेड स्किनमुळे चेहरा काळवंडलाय..एकदाच करा हा उपाय..मिळवा नितळ तजेलदार त्वचा  title=

Dead skin remedies: त्वचेवर डेड सेल्स जमा झाल्या की त्वचा एकदम कोरडी आणि निर्जिव दिसू लागते. यासाठी आपण वेळोवेळी चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकली पाहिजे. चेहऱ्यावरील डेड स्किन वेळीच काढून टाकल्याने त्वचेचा वरील भाग स्वच्छ होतो. त्याचशिवाय रक्ताभिसरण चांगलं राहतं.

एक्सफोलिएशनच्या मदतीने जेव्हा चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकतो तेव्हा याखालील निरोगी पेशी देखील वर येतात. या निरोगी पेशी आपल्या चेहर्‍याला चमकणारा लुक देतात. चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी तुम्ही घरी एक्सफोलिएट करू शकता. ज्यासाठी घरातील वस्तूंची मदत घेतली जाऊ शकते.

घरगुती सामानाने काढून टाका डेड सेल्स

मध आणि साखर
चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी घरातील साखर आणि मध खूप फायदेशीर आहेत. साखर एका स्क्रब प्रमाणे काम करते आणि मध त्वचेला ओलावा देतं. यासाठी, एक चमचा मध आणि फक्त एक चमचा साखर मिसळा. आता ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि थोडावेळ हलक्या हातांनी मालिश करा. यानंतर पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून एकदा डेड सेल्स काढून टाकण्यासाठी तुम्ही हा घरगुती उपाय वापरू शकता.

ओटमील स्क्रब
चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी दोन चमचे ओटमीलतं पीठ घ्या आणि नंतर त्यात थोडे पाणी घाला. याची पेस्ट तयार झाल्यानंतर हलक्या हातांनी ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. साधारण 5 मिनिटांनंतर पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय करून पहा.

बेकिंग सोडा
डागविरहीत चेहऱ्यासाठी बेकिंग सोडा खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळल्यास याचा फायदा अधिक दिसून येतो. एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात व्हिटॅमिन ईच्या एका कॅप्सूलचं तेल मिसळा. ही कॅप्सूल केमिस्टच्या दुकानात सहज मिळेल. आता या दोन्ही गोष्टींमध्ये थोडेसं पाणी मिसळून पेस्ट बनवा आणि सुमारे 3 मिनिटं चेहऱ्यावर हलक्या हातांनी मालिश करा. यानंतर पाण्याने चेहरा धुवा.

कॉफी
कॉफीच्या सहाय्याने चेहरा खुलवण्यास मदत होते. यासाठी दोन ते तीन चमचे कॉफीची पावडर घ्या आणि त्यात एक चमचा नारळ तेल मिसळा. पेस्ट तयार करण्यासाठी थोडेसं पाणीही घालू शकता. आता हलक्या हातांच्या सहाय्याने ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि मग सामान्य पाण्याने चेहरा धुवा.