मातीच्या भांड्यात जेवण शिजवणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या सत्य!

आता काळ बदलला आणि मातीच्या भांड्यांची जाहा स्वयंपाकघरात स्टीलच्या भांड्यांनी घेतली. 

Updated: Jul 10, 2022, 02:36 PM IST
मातीच्या भांड्यात जेवण शिजवणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या सत्य! title=

मुंबई : जुन्या काळात लोकं मातीच्या भांड्यामध्ये जेवण शिजवत असत. मंद आचेवर हळूहळू शिजवलेल्या या अन्नाला चवही अप्रतिम होती. मात्र आता काळ बदलला आणि मातीच्या भांड्यांची जाहा स्वयंपाकघरात स्टीलच्या भांड्यांनी घेतली. मात्र तुम्हाला मातीच्या भांड्यात बनवलेल्या अन्न खाण्याचे फायदे माहित आहेत का? जर तुम्हाला माहिती नसतील तर ही बातमी नक्कीच वाचा

मातीच्या भांड्यात शिजवण्याचे फायदे

माती क्षारीय स्वरूपाची (एल्कलाइन नेचर) आहे. यामुळे मातीच्या भांड्यात पीएचची पातळी योग्य राहते. हे केवळ अन्नाला चांगलं ठेवत नाही तर अन्नाची चवही वाढवतं. लोह, फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे घटक मातीच्या भांड्यांमध्ये असल्याने ते अन्नामध्येही मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.

अन्नाचे पौष्टिक घटक सुरक्षित राहतात

मातीच्या भांड्यांना छोटी छोटी छिद्र असतात. ही छिद्र आग आणि ओलावा यांना योग्य पद्धतीने सर्क्युलेट करतात. यामुळे, अन्नातील पोषक तत्त्व जपले जातात. हेच कारण आहे की मातीच्या भांड्यात तयार केलेल्या अन्नात पोषक घटक जास्त आढळतात.

हृदयासाठीही फायदेशीर

वास्तविक मातीच्या भांड्यांमध्ये तेलाचा कमी वापर केला जातो. याचं कारण असं की, मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याची प्रक्रिया मंद आहे आणि ती जास्त काळ सुरु असते. म्हणून, अन्नात नैसर्गिक तेल आणि नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. ज्यामुळे अन्नामध्ये जास्त तेल वापरण्याची आवश्यकता नाही. जास्त तेलाचा वापर न होणं हे आपल्या हृदयासाठीदेखील चांगलं आहे.

स्वादिष्ट जेवणं तयार होतं

मातीच्या भांड्यांमध्ये खाद्यपदार्थ स्वादिष्ट बनतात हे क्वचितच कोणी नाकारू शकेल. अन्नाच्या चवीप्रमाणे सुगंधही चांगला येतो. तसंच, मातीची भांडी  किफायतशीर आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती निसर्गासाठीही फायदेशीर आहे.