वाफवलेली अंडी किती दिवस टिकतात ?

झटपट नाश्त्याचा पर्याय म्हणून अंड्याची निवड केली जाते.

Updated: Nov 21, 2017, 11:51 AM IST
वाफवलेली अंडी किती दिवस टिकतात ?  title=

मुंबई : झटपट नाश्त्याचा पर्याय म्हणून अंड्याची निवड केली जाते.

सकाळच्या वेळेस घाई होते म्हणून अनेकजण अंडी उकडून फ्रीजमध्ये ठेवतात. पण सोयीचं व्हावे  म्हणून अशाप्रकारे करणं खरंच आरोग्यदायी आहे का ?  

उकडलेली अंडी किती दिवस टिकतात ? 

उकडलेली अंडी तुम्ही फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता. जर उकडलेली अंडी कवचासह ठेवली तर आवडाभर तुम्ही ती खाऊ शकता. पण जर उकडलेलं अंड सोललेले असेल तर ते 3-5 दिवसांमध्ये खावे लागते. 

वाफवलेले अंड कसे ठेवावे ?  

अंड वाफवलेले असेल तर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवावे. तसेच वाफवलेले अंड हवाबंद डब्ब्यामध्ये ठेवा. अंड्याला मॉईश्चरायाझर  मिळाल्यास ते खराब होऊ  शकते. 

वाफवलेले पण कवच न काढलेले अंड खराब होऊ शकते ? 

कवचावरील बॅक्टेरिया पाण्याअम्ध्ये वाफवताना नष्ट होतात. त्यामुळे बॅक्टेरियाचा थेट धोका कमी होतो. 

अंड खराब झाल्याचे कसे ओळखाल ?  

खराब झालेल्या अंड्याला वास येतो. त्याच्या दुर्गंधीवरून तुम्ही हे ओळखू शकता.  उग्र वास येत असल्यास अंड खाऊ नका. 

वाफवलेले अंड इतर प्रकारापेक्षा अधिक फायदेशीर आहे का ? 

अंड तुम्ही कोणत्याही स्वरूपात खाऊ शकता. वाफवलेले अंड हा थोडा आरोग्यदायी प्रकार आहे. तेलकट किंवा तळलेल्या अंड्याच्या प्रकाराचा आरोग्याला अधिक धोका आहे.