शुगर फ्री, लो कॅलरी पदार्थ खाताना जरा सावधान...

शुगर फ्री, लो कॅलरी पदार्थांमुळे वजन कमी होत असलं तरी ते तुमच्या शरीराला घातक आहे.

Updated: Dec 21, 2019, 03:16 PM IST
शुगर फ्री, लो कॅलरी पदार्थ खाताना जरा सावधान... title=
संग्रहित फोटो

ऋचा वैद्य, झी मीडिया, मुंबई : वेटलॉससाठी, मधुमेहासाठी शुगर फ्री, लो कॅलरी असे पर्याय उपलब्ध झाल्याने आनंद वाटून घेत असाल तर जरा थांबा...कारण शुगर फ्री, लो कॅलरी पदार्थांमुळे वजन कमी होत असलं तरी ते तुमच्या शरीराला घातक आहे.

शुगर फ्री बिस्कीट, टोस्ट, ज्यूस किंवा लो कॅलरी प्रोडक्टमुळे मधूमेहापासून दूर राहू, वजन कमी करू असं आपल्याला वाटतं. मात्र याचा जास्त वापर आपल्याला सरळ मधुमेहाच्याच दिशेने घेऊन जातो हे फार कमी जणांना माहितेय. न्यूयॉर्क आणि ऑस्ट्रेलियामध्ये केलेल्या संशोधनातून हे सिद्ध झालं आहे. 

गेल्या २० वर्षात शुगर फ्री पदार्थ घेण्याचं प्रमाण ५४ टक्क्यांनी वाढलंय. तर लहान मुलांनाही शुगर फ्री पदार्थ खाऊ घालण्याचं प्रमाण २०० टक्क्यांनी वाढल्याचं समोर आलं आहे. म्हणूनच  लहान मुलांमध्येही आजकाल मधुमेह सर्रास आढळून येतोय. 

कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर गेल्यास त्याचे दुष्परिणाम हे दिसतातच. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिवापर टाळणं आणि आरोग्याबाबत वेळीच सावधानता बाळगणं आवश्यक आहे.