कोट्यवधींचा खर्च लाखांवर... 'या' 4 दुर्धर आजारांवरील औषधं बनवण्यात भारताला यश

Medicines for 4 rare diseases: भारतामध्ये वेगवेगळ्या दुर्धर आजारांची ग्रासलेल्या रुग्णांची संख्या 8.4 कोटी ते 10 कोटींदरम्यान आहे. या दुर्धर आजारांपैकी 80 टक्के आजार हे जेनेटिक आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 25, 2023, 05:12 PM IST
कोट्यवधींचा खर्च लाखांवर... 'या' 4 दुर्धर आजारांवरील औषधं बनवण्यात भारताला यश title=
वर्षभरापासून सुरु होते प्रयत्न

Medicines for 4 rare diseases: भारतामध्ये चार दुर्मिळ औषधांची निर्मिती केली जाणार आहे. दुर्धर आजारांवरील या औषधांसाठी आतापर्यंत भारतीयांना कोट्यावधी रुपये मोजावे लागायचे. मात्र आता ही औषध भारतातच तयार होणार असल्याने काही लाखांमध्ये ती उपलब्ध होतील. याशिवाय सिकल सेल आजाराशी संबंधित सिरपही भारतात तयार केलं जाणार आहे. वर्षभरापूर्वी भारताने 13 दुर्मिळ औषधांच्या निर्मितीसाठीचे प्रयत्न सुरु केले. यापैकी 4 औषधांची निर्मिती करण्यात भारताला यश आलं आहे. जागतिक स्तरावरील परिस्थिती पाहता भारतासाठी ही फार महत्त्वाची बाब असून यामुळे परदेशी चलन वाचण्यासही मदत होणार आहे.

आता परदेशातून आयात करण्याची गरज नाही

भारताच्या या यशामुळे दुर्धर आजारांसाठी वापरली जाणारी औषधं भारतातच निर्माण होणार आहेत. त्यामुळेच आयात खर्च आणि इतरही खर्च वाचणार असल्याने ही औषधं बऱ्यापैकी स्वस्त होणार आहेत. भारतामध्ये वेगवेगळ्या दुर्धर आजारांची ग्रासलेल्या रुग्णांची संख्या 8.4 कोटी ते 10 कोटींदरम्यान आहे. या दुर्धर आजारांपैकी 80 टक्के आजार हे जेनेटिक आहेत. म्हणजेच हे आजार अनेक मुलांना जन्मापासूनच असतात. या आजारांवर उपचार करायचा झाला तरी तो सर्वसामान्यांना शक्य होत नाही. कोट्यवधी रुपयांची इंजेक्शने आणि औषधं परदेशातून आयात करावी लागतात. अनेकदा लोकवर्गणीमधून किंवा सरकारच्या मदतीने विशेष केस म्हणून असली औषधं मागवली जायची. मात्र आता याची गरज पडणार नाही. भारताने वर्षभरामध्येच चार दुर्धर आजारांवरील औषधं बनवण्यात यश मिळवलं आहे. ही औषधं मोठ्याप्रमाणात उपलब्ध करुन देण्याचीही सरकारची योजना असून त्यावर काम सुरु आहे.

दुर्धर आजारांवरील ही चार औषधं भारताने तयार केली :- 

1) टायरोसेनिमिया टाइप 1 : वर्षभरासाठी या औषधावर साडेतीन कोटींचा खर्च व्हायचा, आता केवळ 2.5 लाखात ती उपलब्ध होतील.

2) Gaucher : आधी या औषधासाठी अडीच ते 6 कोटी रुपये खर्च व्हायचा. आता 2.5 लाखांमध्ये हे औषध मिळेल.
 
3) Wilson : 1.8 ते 3.6 कोटी रुपये वार्षिक खर्च यायचा. आता हे काम 3 लाखांमध्ये होईल.

4) Dravet : जवळपास 6 से 20 लाख खर्च येणारं हे औषध आत 1 ते 5 लाख रुपयांमध्ये मिळेल.

या 4 आजारांवरील औषधांची नावं खालीलप्रमाणे -

1) Nitisinone

2) Eliglusat (3 कोटींवरुन किंमत 2.5 लाखांना)

3) Trientine (2.2 कोटींवरुन किंमत 2.2 लाखांवर)

4) Cannabidiol (7 ते 34 लाखां वरुन किंमत आता 1 ते 5 लाख) 

खालील व्याधींवर औषधं तयार करण्याचं काम सुरु -

1) Phenylketonutoria

2) Hyperammonemia

3) Cytic Fibrosis

4) Sickle Cell 

काही महिन्यांमध्ये 13 पैकी आणखी 4 औषधं तयार करुन बाजारात उपलब्ध करुन दिली जातील.