मुंबई : आयुष्यात जोडीदार हवाच. त्याच्याशिवाय आयुष्य घालवणे काहीसे कठीण होते, असे बोलले जाते. पण तरी देखील काही मुली सिंगल राहणे पसंत करतात. वयाबरोबर बदलत गेलेले विचार त्यांना अशा निर्णयापर्यंत आणतात. पण मुली असा निर्णय का घेतात? यामागचे कारणं तुम्हाला माहित आहे का? तर मग जाणून घेऊया मुलींच्या सिंगल राहण्यामागे नक्की काय उद्देश असतो...
लग्नानंतर करिअरवर परिणाम होईल, असे अनेक मुलींना वाटते. कारण लग्नानंतर घर, संसार, ऑफिस अशी तारेवरची कसरत करावी लागते. लग्नानंतर मुलांच्या आयुष्यात फारसा बदल होत नाही. पण मुलींना नवीन परिवाराशी जुळवून घेणे, अशा विविध बदलांना सामोरे जावे लागते. त्यामुळे करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत होऊ शकणार नाही, असे अनेकींना वाटत असते.
अनेक मुली अशा आहेत ज्यांना कामानंतर एकटं राहण्यातच समाधान मिळतं. एकट्या राहुन त्या खूप खूश असतात. वयानुसार किंवा वेळेनुसार त्यांचे विचार परिपक्व झालेले असतात. मॅच्युरिटी आलेली असते.
सासरी गेल्यावर सासऱ्यांच्या हिशोबाने चालावे लागेल, असे ऐकतच मुली लहानाच्या मोठ्या झालेल्या असतात. सासरी माहेर इतका आराम, स्वातंत्र मिळणार नाही, याची कल्पना मुलींना आधीपासूनच असते. त्यामुळे आत्मनिर्भर मुलींना त्यांचे स्वातंत्र हिरावून घेतलेले आवडत नाही.
मनासारखा मुलगा न मिळाल्यास अनेक मुली सिंगल राहणे पसंत करतात. अशा मुलींना त्यांच्या अपेक्षेत बसणारा मुलगा हवा असतो. तसा मुलगा न मिळाल्यास अॅडजस्ट करण्यासाठी या मुली तयार नसतात.
मुलींच्या सिंगल असण्यामागे 'स्वतंत्र राहणे' हे एक कारण असते. लग्नानंतर पावलोपावली इतरांसाठी, नवऱ्यासाठी विचार करणे. मग निर्णय घेणे त्यांना काहीसे पटत नसते. त्यामुळे आपल्या मनाप्रमाणे आयुष्य व्यतीत करण्यासाठी त्या सिंगल राहणे पसंत करतात. त्याचबरोबर त्यांना कधी कोणाची कमीही जाणवत नाही.