या ११ वस्तू फ्रिजमध्ये अजिबात ठेऊ नका!

स्वयंपाकघरातील साहित्य, शिजवलेले अन्न सुस्थितीत ठेवण्यात फ्रिज मोलाचे कार्य करतो.

Updated: Apr 26, 2018, 12:51 PM IST
या ११ वस्तू फ्रिजमध्ये अजिबात ठेऊ नका! title=

मुंबई :  स्वयंपाकघरातील साहित्य, शिजवलेले अन्न सुस्थितीत ठेवण्यात फ्रिज मोलाचे कार्य करतो. पण नेमक्या कोणत्या वस्तू फ्रिजमध्ये ठेवाव्यात किंवा नाही याची माहिती असणे गरजेचे आहे. कारण काही वस्तू फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होतात किंवा इतर वस्तू खराब करतात. त्यामुळे किचनमधील कोणतेही सामान फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी एकदा विचार करा. या काही वस्तू ज्या चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नका. 

कॉफी

कॉफी फ्रिजमध्ये ठेऊ नका. कॉफी फ्रिजमध्ये ठेवल्याने दुसऱ्या गोष्टींनाही त्याचा वास येतो आणि कॉफी लवकर खराब होते.

मध

मधात आधीच प्रिजव्हेटिव्हीज असतात. मध साध्या बॉटलमध्ये ठेवल्यास वर्षानुवर्ष टिकेल. मात्र फ्रिजमध्ये ठेवल्याने ते घट्ट होते व काढणे अवघड होते.

लोणचे

लोणच्यात व्हिनेगर असते. हे फ्रिजमध्ये ठेवल्याने लोणच्यासोबत इतर साहित्यही खराब होते.

केळे

केळे फ्रिजमध्ये ठेवल्यास ते काळे पडते. यातून इथाइलीन नावाचा गॅस बाहेर पडतो. त्यामुळे केळ्यासोबत दुसरी फळेही खराब होतात.

टोमॅटो

टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने ते लवकर नरम पडतात आणि त्याची चवही बिघडते.

बटाटे

बटाटे फ्रिजमध्ये ठेवल्याने स्टार्चचे रुपांतर शुगरमध्ये होते. यामुळे बटाट्याचा स्वादही बिघडतो.

आंबट फळे

संत्र, लिंबू, यांसारखी आंबट फळे फ्रिजमध्ये ठेऊ नका. हे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्याने फळांच्या साली काळ्या पडतात आणि त्यातील रसही सुकू लागतो.

कलिंगड 

न कापलेले कलिंगड फ्रिजमध्ये ठेऊ नका. यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात. ते फ्रिजमध्ये ठेवल्याने खराब होतात.

कांदा

कांदा फ्रिजमध्ये ठेवल्याने नरम होतो आणि कालांतराने खराब होऊ लागतो.

लसूण

लसूण फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याला अंकूर फुटू लागतात. तो नरम पडून खराब होऊ लागतो. 

तेल

खोबरेल तेल आणि ऑलिव्ह ऑईल फ्रिजमध्ये ठेऊ नका. फ्रिजमध्ये ठेवल्याने ते घट्ट होते आणि फ्रिजमधून काढल्यानंतर ते सामान्य तापमानावर येईपर्यंत खूप वेळ लागतो.