बेल्ट लावताना तुम्ही ही चूक करता का?

अनेकांना रोज कमरेला बेल्ट बांधण्याची सवय असेत. मात्र काहीजणांना कमरेला बेल्ट घट्ट बांधण्याची सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल तर वेळीच थांबा. कारण या अशा सवयीमुळे तुम्ही स्वत:चेच नुकसान करताय.

Updated: Dec 7, 2017, 11:44 AM IST
बेल्ट लावताना तुम्ही ही चूक करता का?

मुंबई : अनेकांना रोज कमरेला बेल्ट बांधण्याची सवय असेत. मात्र काहीजणांना कमरेला बेल्ट घट्ट बांधण्याची सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल तर वेळीच थांबा. कारण या अशा सवयीमुळे तुम्ही स्वत:चेच नुकसान करताय.

दिवसभर कमरेला घट्ट बेल्ट बांधल्यास पोटाच्या नसा दबल्या जातात. बऱ्याच वेळेस असे होत असेल तर धमन्या, शिरा, स्नायू आणि आतड्यांवर दाब पडतो. यामुळे स्पर्म काऊंट कमी होऊ शकतो ज्यामुळे पुरुषांमध्ये फर्टिलिटीचे प्रमाण घटण्याची शक्यता असते. 

घट्ट बेल्ट बांधल्याने हे नुकसान होते

खाण्याचे पचन नीट होत नाही

अॅसिडिटीचा प्रॉब्लेम सतावू शकतो

बद्धकोष्ठतेचा त्रास सतावू शकतो

पायांची हाडे कमकुवत होतात

स्पर्म काऊंट कमी होण्याची शक्यता असते

पायांमध्ये गोळे येतात

कमरेचा त्रास वाढू शकतो