लग्नसराईत फिट राहण्यासाठी खास टिप्स....

लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे लग्नघरी धावपळ, गडबड गोंधळ असेलच. या सगळ्यात नवरी मुलीची खूप धावपळ होते.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 22, 2018, 08:23 PM IST
लग्नसराईत फिट राहण्यासाठी खास टिप्स.... title=

मुंबई : लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे लग्नघरी धावपळ, गडबड गोंधळ असेलच. या सगळ्यात नवरी मुलीची खूप धावपळ होते. अनेक गोष्टींचा ताण मनावर शरीरावर येतो. त्यात भरीस भर म्हणून भावनिक चढ उतार होत असतात. या सगळ्यामुळे तब्बेतीची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लग्नातील जेवणामुळे अनेकांना त्रास होतो. यापासून बचाव करण्यासाठी सेलिब्रेटी न्यु्ट्रीशियनिस्ट रुजुता दिवेकर यांनी काही खास टिप्स दिल्या आहेत.

ताक प्या

दुपारी जेवणानंतर हिंग आणि काळं मीठ घालून एक ग्लास ताक पिणे आरोग्यदायी ठरेल. ताकात प्रोबायोटिक्स आणि व्हिटॉमिन बी १२ मुबलक प्रमाणात असतात. हिंग आणि काळं मीठ याच्या मिश्रणामुळे ब्लॉटिंग, गॅस याप्रकारचे त्रास कमी करण्यात मदत होते. 

एक चमचा च्यवनप्राश खा

रात्रभर चालणाऱ्या लग्नासाठी किंवा डेस्टिनेशन वेंडिंगसाठी तुम्ही जाणार असाल तर एक चमचा च्यवनप्राश जरूर खा. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते. त्वचेच्या समस्या असतील तर त्याची काळजी घेतली जाते. त्वचा कोमल, मुलायम राहते. 

मेथीचे लाडू खा

बद्धकोष्ठता रोखण्यासाठी मेथीचे लाडू उपयुक्त ठरतात. केसांची चमक टिकून राहते. दूरवरचा प्रवास, तणाव आणि जागरण यामुळे होणार त्रास दूर होण्यास मदत होते. रक्तसंचार सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी नाश्त्याला आणि संध्याकाळी ४-६ च्या दरम्यान लागलेल्या भूकेसाठी गुळ, तूप, सुंठ घातलेले मेथीचे लाडू खाणे फायदेशीर ठरेल.