मुंबई : उन्हाळा सुरू होताच वीज कपात होऊ लागते. मग शहर असो किंवा गाव. वीज गुल होतेच. अशावेळी या समस्येवर तोडगा म्हणून इनवर्टर किंवा जेनरेटरचा पर्याय वापरला जातो. त्यामुळे काही वेळ निवांत जातो. पण उन्हाळ्यात एसी शिवाय राहणे कठीण होते. त्यासाठी अशा काही टिप्स ज्यामुळे तुम्ही एसीशिवाय निवांत झोपू शकता.
उन्हाळ्यात सिंथेटिक बेडशीट्ला बाय बोला. कारण त्यामुळे वेटींलेशन नीट होत नाही. म्हणून कॉटन बेडशीटचा वापर करा. त्यामुळे वेटींलेशन नीट होईल आणि घामही येणार नाही.
ही आयडीया तुम्हाला थोडी विचित्र वाटेल. पण हा अत्यंत परिणामकारक उपाय आहे. बेडशीट रोल करुन फ्रिजमध्ये ठेवा आणि झोपण्यापूर्वी बेडवर घाला. तुम्हाला झोप लागेपर्यंत तरी थंडावा मिळेल. यामुळे पंख्याची हवाही थंड वाटेल.
उन्हाळ्यात टेबल फॅनचा जरुर वापर करा. आजकाल बाजारात विविध प्रकराचे टेबलफॅन्स उपलब्ध आहेत. जर एसी, कूलर किंवा इनवर्टरचा नसेल तर टेबल फॅन हा उत्तम पर्याय आहे.
झोपण्यापूर्वी टरबूज, काकडी, दही, ताक यांसारख्या पदार्थांचे सेवन करा. उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी अंड, सायट्रस फळे, तिखट, मसालेदार पदार्थ रात्री खावू नका. कारण यामुळे तुम्हाला शरीर जड झाल्यासारखे वाटेल आणि पचनासाठीही हे पदार्थ योग्य नाहीत.
बर्फाचे क्युब्स एका मोठ्या भांड्यात डाका आणि हे भांडे टेबल फॅनजवळ ठेवा. त्यामुळे थंड हवा मिळेल आणि चांगली झोप लागेल.
उन्हाळ्यात सर्व नाईट सूट बाजूला ठेवा. त्याऐवजी पातळ टी-शर्ट, कुर्ता, पायजमा, शॉर्ट्स असे कपडे घालून झोपा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. या कपड्यांमुळे हवा खेळती राहील आणि थंड वाटेल.
झोपण्यापूर्वी नेहमी साध्या पाण्याने अंघोळ करा. यामुळे तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल. पाण्यामुळे शरीराचे तापमान कमी होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. त्यामुळे झोपही चांगली लागेल.