जम्मू-काश्मीरमध्ये ४ दहशतवादी ठार

जम्मू कश्मीरमधील बडगाममध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Nov 30, 2017, 01:33 PM IST
जम्मू-काश्मीरमध्ये ४ दहशतवादी ठार title=

श्रीनगर : जम्मू कश्मीरमधील बडगाममध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. 

रिपोर्ट्सनुसार जवानांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं असून अजूनही चकमक सुरु आहे. तर एक जवान जखमी झाला आहे. सुरक्षा रक्षकांनी या संपूर्ण भागाला घेरलं असून या भागात अजून सर्च ऑपरेशन सुरु आहे.

जम्मू-काश्मीर मध्ये सतत दहशतवादी कारवाया सुरु असतात. दहशतवादी या भागातून देशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतात. पण जवानांनी पुन्हा एकदा त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.