प्रेयसीसाठी बायकोचं नाक कापलं आणि नंतर खिशात ठेवून झाला फरार; पत्नीने रक्तबंबाळ अवस्थेत मुलाला उचललं अन्...

Crime News: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Khiri) येथे प्रेयसीच्या नादात पतीने धारदार शस्त्राने पत्नीचं नाक कापून टाकलं. इतकंच नाही तर यानंतर कापलेलं नाक खिशात ठेवून फरार झाला. पत्नीने रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या.   

शिवराज यादव | Updated: Jul 3, 2023, 10:35 AM IST
प्रेयसीसाठी बायकोचं नाक कापलं आणि नंतर खिशात ठेवून झाला फरार; पत्नीने रक्तबंबाळ अवस्थेत मुलाला उचललं अन्... title=

Crime News: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Khiri) येथे एका व्यक्तीने प्रेयसीच्या नादात धारदार शस्त्राने पत्नीचं नाक कापून टाकलं. इतकंच नाही तर यानंतर कापलेलं नाक खिशात ठेवून फरार झाला. पत्नीने रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीचा शोध सुरु केला होता. घटनेनंतर काही वेळातच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. 

बांसताली गावात राहणाऱ्या विक्रमचं काही वर्षांपूर्वी मोहम्मदाबाद गावातील सीमादेवीशी लग्न झालं होतं. लग्नानंतर त्यांना दोन मुलंही झाली. पण याचदरम्यान, विक्रमचं गावातील एका महिलेवर प्रेम जडलं. यानंतर त्याच्या विवाहबाह्य संबंधांना सुरुवात झाली. सीमाला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा तिने आपला विरोध दर्शवला आणि जाब विचारण्यास सुरुवात केली. 

यावरुन दोघांमध्ये रोज भांडण होऊ लागलं होतं. पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास विक्रमने मला स्वयंपाक करण्यास सांगितलं. मी स्वयंपाक झाल्यानंतर त्याला जेवण वाढलं. यानंतर त्यांच्यात पुन्हा एकदा प्रेमप्रकरणावरुन भांडणं सुरु झाली. त्यावेळी विक्रमने आपला राग मुलीवर काढण्यास सुरुवात केली. यानंतर पत्नीने मुलीला वाचवण्यासाठी मध्यस्थी करण्यास सुरुवात केली. याचवेळी विक्रमने धारदार शस्त्र काढलं आणि पत्नीचं नाक कापून टाकलं. यानंतर त्याने ते कापलेलं नाक आपल्या खिशात ठेवलं आणि घरातून फरार झाला. 

यानंतर पत्नी कापलेल्या नाकासह रक्तबंबाळ अवसथेत पोलीस स्टेशनला आली आणि पतीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पीडित पत्नी सीमादेवीने केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी पती विक्रमविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी सीमादेवीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. 

पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकत कोर्टात हजर केलं होतं. कोर्टाने त्याची रवानगी जेलमध्ये केली आहे. याप्रकरणी लखीमपूरचे पोलीस अधिकारी संदीप सिंह यांनी सांगितलं आहे की, मितौली पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील बांसताली गावात पतीने आपल्या पत्नीवर हल्ला केला आणि नाक कापून टाकलं. गुन्हा दाखल करत आरोपी पतीला जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.