चौदा बोगस बाबाबुवांची यादी जाहीर

सभेनंतर सर्व अखिल भारतीय परिषदेने सर्व मान्यतेसह १४ बनावट बाबांची यादी जाहीर केली.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 10, 2017, 03:29 PM IST
चौदा बोगस बाबाबुवांची यादी जाहीर  title=

उत्तर प्रदेश : अखिल भारतीय अखाड़ा परिषदेची बैठक नुकतीच अलाहाबाद शहरात पार पडली. यामध्ये चौदा बोगस बाबाबुवांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत आसाराम बापू, राम रहिम बाबा, राधे मॉ, निर्मल बाबा, इच्छाधारी भिमानंद, असीमानंद, सच्चिदानंद गिरी अशा प्रमुख बाबाबुवांची नावे आहेत. 

या बैठकीला सर्व १३ राज्यांतील प्रतिनिधींना सभेत सामील होण्यासाठी बोलावले होते. सभेनंतर सर्व अखिल भारतीय परिषदेने सर्व मान्यतेसह १४ बनावट बाबांची यादी जाहीर केली. ही यादी सरकारकडे सोपवले जाणार आहे. त्यामुळे लोकांच्या विश्वासाशी खेळणाऱ्यांच्या मुसक्या आता आवळणार आहेत.