'मीच ईश्वर आहे सांगत माझ्यावर बलात्कार'

डेरा सच्चा सौदा आश्रमात राहणाऱ्या एका साध्वीचे पत्र समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 29, 2017, 10:36 AM IST
'मीच ईश्वर आहे सांगत माझ्यावर बलात्कार' title=

चंडीगढ :  राम रहीमच्या काळ्या कतृत्वांची यादीच दिवसेंदिवस समोर येत आहे. डेरा सच्चा सौदा आश्रमात राहणाऱ्या एका साध्वीचे पत्र समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हे पत्र त्या साध्वीने २००२ साली पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना लिहिले होते आणि यामध्ये राम रहिम करत असलेल्या कुकृत्यांचा पाढाच लिहिला होता.  

त्या साध्वीने या पत्रात रहीमवर बलात्काराचा आरोप केला होता. डेरा सच्चा सौदात अध्यात्माच्या नावाखाली होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचं सविस्तर वर्णन या साध्वीनं आपल्या पत्रात केलं होतं.ही साध्वी त्या आश्रमात राहणारी होती. घरातील मंडळी राम रहिमचे अंध भक्त असल्याने मला इथे पाठविल्याचे ती या पत्रात म्हणते.

'मीच ईश्वर'

 एके रात्री दहा वाजता राम रहिमने त्या साध्वीला आपल्या निवासस्थानी बोलावले. ती तिथे गेली तेव्हा राम रहीम हातात रिमोट घेऊन टीव्हीवर ब्ल्यू फिल्म पाहत होता. ती आल्यावर राम रहिमने टीव्ही बंद केला आणि साध्वीला आपल्या जवळ बसविले. 'मी तुला आपली खास प्रिय म्हणून बोलावले आहे, तू आपलं तन मन धन मला अर्पण कर' असे तो म्हणाले. त्या साध्वीने विरोध केल्यानंतर मीच ईश्वर असल्याचे बाबाने तिला सांगितले. 

शेकडो मुली जाळ्यात

इथे माझ्यासारख्याच आणखी शेकडो मुली आहेत, ज्या डेरामध्ये १७-१८ तास सेवा देतात. आमचं याठिकाणी शारिरीक शोषण केलं जाते  डेरा महाराज गुरमीत सिंग डेरातल्या मुलींवर बलात्कार करतात. असे या पत्रात त्या साध्वीने म्हटले होते.

डेऱ्यात असलेल्या ३५ ते ४० मुली या ३५ ते ४० वर्षांच्या आहेत. त्यांचं लग्नाचं वय उलटून गेलंय. आमची अवस्था वेश्येपेक्षाही खडतर आहे. आमच्या जीवाला धोका आहे अशी व्यथाही तिने मांडली.

'आमची वैद्यकीय तपासणी करा'

या सर्व मुलींसह माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांची हत्या केली जाईल पण मी गप्पही बसू शकत नाही आणि मला मरायचंही नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही तिने त्यावेळी पत्रातून केली होती. आमची वैदयकीय तपासणी झाली तर समजेल की आम्ही कुमारी साध्वी आहोत की नाही?" असा खळबळजनक खुलासाही तिने केला होता.