उपराज्यपालांच्या कार्यालयाबाहेर केजरीवालांचा ठिय्या

 आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत उपराज्यपाल यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून बसणार

Updated: Jun 12, 2018, 04:19 PM IST
उपराज्यपालांच्या कार्यालयाबाहेर केजरीवालांचा ठिय्या  title=

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कॅबिनेट मंत्र्यासोबत दिल्लीच्या एलजी हाऊसमध्ये धरण आंदोलन करतायत. आपल्या तीन मागण्यांसाठी हे धरणं आंदोलन होतंय. आएएस अधिकाऱ्याचा बेकायदेशीर संप तातडीने रद्द करावा, कामबंद आंदोलन करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी आणि रेशनिंग संदर्भात डोअर-स्टेप-डिलीव्हरी योजनेला मंजुरी देण्यात यावी, अशा केजरीवाल यांच्या मागण्या आहेत. 

गेल्या चार महिन्यांपासून आएएस अधिकाऱ्यांचा सुरु असलेला हा संप थांबवण्यासाठी उपराज्यपालांकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याचा आरोप केजरीवाल यांनी केलाय. 

त्यामुळे आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत उपराज्यपाल यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून बसणार असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय... तर दुसरीकडे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल आपल्याला धमकावत असल्याचं म्हटलंय.