उत्तर प्रदेश : विधान परिषदेसाठी भाजपने बंडखोरांना उतरवले रिंगणात

भाजपने संघटनेच्या चार लोकांनाही विधिमंडळाच्या उच्च सभागृहात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे त्यात दोन विद्यमान आमदार आणि इतर काही बंडखोरांनाही संधी देण्याचा निर्णय भाजपला घ्यावा लागला. 

Updated: Apr 15, 2018, 05:19 PM IST
उत्तर प्रदेश : विधान परिषदेसाठी भाजपने बंडखोरांना उतरवले रिंगणात title=

लखनऊ : भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या १० उमेदवारांची घोषणा केली. उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या १३ जागांसाठी २६ एप्रिलला निवडणुका होणार आहेत. निवडणुकीसाठी ९ एप्रिल अधिसूचना ९ एप्रिललला जारी करण्यात आली होती. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल आहे. या निवडणुकीसाठी भाजपने विद्या सागर सोनकर, अशोक कटारिया, विजय बहादुर पाठक, अशोक धवन, बुक्कल नवाब, सरोजिनी अग्रवाल, यशवंत सिंह, जयविर सिंह, डॉं. महेंद्र सिंह आणि मोहसिन रजा यांच्या नावाची घोषणा भाजपने केली आहे.

आयात उमेदवारांना भाजपने दिली संधी

दरम्यान, या नावांची घोषणा करताना भाजपने बंडखोरांसह नव्या नवलाईने पक्षात प्रवेश घेतलेल्यांनाही भाजपने संधी दिली आहे. सरोजिनी अग्रवाल, बुक्कल नवाब आणि यशवंत सिंह हे आगोदर समाजवादी पक्षाचे आमदार होते. दोन्ही नेत्यांनी समाजवादी पक्षाचा त्याग करत भाजपमध्ये प्रवेश मिळवला आणि निवडणुकीचे तिकीटही मिळवले.  या तिघांशिवाय बसपचे माजी विधानसभा परिषद सदस्य ठाकूर जयवीर सिंह यांनीही बसपचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.

बंडखोरांनाही दिली संधी

भाजपने संघटनेच्या चार लोकांनाही विधिमंडळाच्या उच्च सभागृहात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे त्यात दोन विद्यमान आमदार आणि इतर काही बंडखोरांनाही संधी देण्याचा निर्णय भाजपला घ्यावा लागला. यात विजय बहादुर पाठक, विद्यासागर सोनगर, अशोक कटारिया आणि अशोक धवन यांचा समावेश आहे.