सणासुदीत बॅंकानी ग्राहकांना दिलीय आनंदाची बातमी

सरकारी बॅंकानी आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 30, 2017, 10:50 AM IST
सणासुदीत बॅंकानी ग्राहकांना दिलीय आनंदाची बातमी title=

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सरकारी बॅंकानी आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय (स्टेट बँक ऑफ इंडिया) ने आपल्या बेस रेटमध्ये ०.०५ टक्के कपात केली आहे. तसेच, बँक ऑफ बडोदा आणि आंध्र बँकेनेही बेस रेट कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे बॅंकच्या जुन्या ग्राहकांना त्यांना मूळ दराने कर्ज घेतानाफायदा होणार आहे. 

या बँकांचे कर्ज स्वस्त आहेत

बँक ऑफ बडोदा यांनी मूळ व्याजदर ०.३५ टक्क्यांनी कमी करुन ९.१५ टक्के केले. त्याच वेळी आंध्र बँकेने मूळ दर ०.१५% ने कमी केले आहेत. १ऑक्टोबरपासून दर ९.७० टक्क्यांवरून ९.५ टक्क्यांवर आला आहे.

कमी ईएमआय 

बेस रेट कमी झाल्याने गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि व्यवसाय कर्जधारक जुन्या ग्राहकांना कमी ईएमआय लागणार आहे.

नव्या ग्राहकांना फायदा नाही

बेस रेट कमी झाल्याने कर्ज घेणाऱ्या नव्या ग्राहकांना फायदा होणार नाही. सध्या बँका मार्जिनल कास्टवर आधारीत एमसीएलआर वर कर्ज देत आहेत. 
रिझर्व्ह बँकेने दरात कपात केलेल्या ग्राहकांना एमसीएलआर लागू केले आहे.

बेस रेट म्हणजे ?

ही प्रणाली १ जुलै २०१० पासून लागू झाली. बेंचमार्क प्रमुख कर्ज दर (प्राइम लेंडिंग रेट) च्या जागी बेस रेट लागू करण्यात आला आहे.
लागू झाल्यानंतर कोणतेही व्यावसायिक बँक मूळ दरांपेक्षा कमी दराने कर्ज देऊ शकत नाही.
लहान उद्योगांना त्याच्या अंमलबजावणीतून फायदा झाला आहे. तत्पूर्वी, बँका मोठ्या कंपन्यांना कमी दराने कर्ज देत आणि लहान उद्योगांना उच्च दराने कर्ज देत असत.