Budget 2023: 3 वर्षात 38800 शिक्षक-कर्मचाऱ्यांची मेगाभरती, काय असेल पगार आणि सुविधा?

Budget 2023 LIVE Updates : गेल्या काही काळापासून रोजगार क्षेत्रासाठी निर्मला सीतारामन या कायमच पुढाकार घेताना दिसतात. त्यामुळे येत्या वर्षीही रोजगारासंबंधी योजनांना महत्त्व दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

Updated: Feb 1, 2023, 05:01 PM IST
Budget 2023: 3 वर्षात 38800 शिक्षक-कर्मचाऱ्यांची मेगाभरती, काय असेल पगार आणि सुविधा?  title=

Union Budget 2023 Live Updates : सध्या सगळ्यांचेच लक्ष हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे लागले आहे. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात आपल्याला कोणकोणत्या तरतुदी मिळणार याकडेही शिक्षक तसेच कर्मचारी यांचे लक्ष वेधले आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पातून केंद्रीय मंत्री यांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी (Education Budget) एक मोठी घोषणा केली आहे. पुढच्या 3 वर्षांत केंद्राकडून 38,800 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची एकलव्य मॉडेल निवासी (Eklavya Model Residential School) शाळांसाठी भरती करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना (Students) याचा फायदा होणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. (Budget 2023 LIVE : Recruiting 38,800 teachers in the next 3 years is a big announcement made by Finance Minister Nirmala Sitharaman)

गेल्या काही काळापासून रोजगार क्षेत्रासाठी (Employment) निर्मला सीतारामन या कायमच पुढाकार घेताना दिसतात. त्यामुळे येत्या वर्षीही रोजगारासंबंधी योजनांना महत्त्व दिल्याचे पाहायला मिळाले आहे. परदेशी पर्यटनालाही (Foreign Travel) चालना मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यातून आता शिक्षण क्षेत्राताही मोठ्या प्रमाणात शिक्षक आणि कर्मचारी भरती सुरू होणार आहे. त्यासोबत सुरू असलेल्या बजेटमध्ये कर्मचारी वर्गालाही मोठा दिलासा मिळेल. शेतकरी वर्गासाठीही अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मोठी घोषणा केली आहे त्यासोबतच विद्यार्थ्यांनाही या शिक्षक भरतीचा फायदा होणार आहे. 

शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बोगस शिक्षकांचीही वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातून अनेक पदंही रिक्त (Recruitment) झाली आहे. अशावेळी अनेक शिक्षकांसाठी अनेक गोष्टी करण्याची गरज झाली आहे.  देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. गेल्या वर्षापासून देशांतर्गत आणि विदेशी पर्यटकांचा भारतात आकडा वाढला आहे. यातूही मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. अशा महत्त्वपुर्ण रोजगाराच्या संधी वाढल्यानं पर्यटन हे मोठे रोजगार क्षेत्र बनले आहे.

सर्वसमावेशक विकास, पायभूत सुविधा, गुंतवणूक, हरित विकास, आर्थिक क्षेत्र, कृषी क्षेत्र या सगळ्यांमध्ये मोठी तरतूद करण्यात आली आहे. या बजेटमधून करदात्यांचे सगळ्यात जास्त लक्ष लागले होते. त्यातून मध्यमवर्गीयांना काय मिळणार याकडेही सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. सगळ्यात मोठ्या प्रमाणात तर नोकरदारवर्गाचे लागले आहे. नोकरदार वर्गातच्या खिशात काय पडेल यावर अनेकांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे.